(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फायनलमध्ये कुणाचे पारडे जड? स्मिथ-रैनाने स्पष्टच सांगितले
IPL 2022: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टाइटन्स यांच्यामध्ये रविवारी आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे.
Hardik Pandya Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2022: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टाइटन्स यांच्यामध्ये रविवारी आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा दोन वेळा आमना सामना झाला आहे. स्मिथ आणि रैना यांच्यामते, फायनलसारख्या हायहोल्टेज सामन्यात काही गोष्टी वेगळ्या होतात. त्यामुळे फेव्हरेट संघ कोणताही असू शकत नाही.
2008 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार स्मिथ म्हणाला की, विजेत्याची भविष्यवाणी करणे कठीण आहे. कारण दोन्ही संघात एकापेक्षा एक मॅचविनर आहेत. स्मिथने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, " दोन्ही संघातील विजेता निवडणे कठीण आहे. पण राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्सपेक्षा सक्षम दिसतेय. कारण, अहमदाबादच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने एक सामना खेळला आहे. त्याना खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज आहे. गुजरात संघाने अद्याप या मैदानावर एकही सामना केळलेला नाही. "
दरमयान, भारताचा माजी खेळाडू आणि मिस्ट आयपीएल सुरेश रैनानेही स्मिथच्या वक्तव्याचं समर्थने केले. पण रैना म्हणाला की, गुजरातचा संघाला भरपूर आराम मिळालाय. त्यामुळे खेळाडू ताजेतवाने असतील. तर राजस्थानच्या खेळाडूंना कमी आराम मिळालाय. सामन्यात ही बाब म्हत्वाची ठरू शकते.
साखळी फेरीत दोन्ही संघाची कामगिरी कशी आहे?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स यंदा तुफान फॉर्मात आहे. पदार्पणाच्या हंगामात गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. गुजरात टायटन्सने (GT) साखळी सामन्यात दहा सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले होते. तर चार सामन्यात गुजरातचा फक्त पराभव झाला होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सनेही दमदार कामगिरी केली होती. राजस्थान रॉयल्सने 14 सामन्यात नऊ विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. राजस्थानला क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. तर क्वालिफयर 2 मध्ये आरसीबीचा पराभव करत राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये प्रवेश केलाय.