IPL 2022 : रोहित शर्माच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये असा करणारा पहिलाच खेळाडू
Rohit Sharma, IPL 2022 : मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये सध्या लढत सुरु आहे. चेन्नईच्या गोलंदाजीपुढे मुंबईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
Rohit Sharma, IPL 2022 : मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये सध्या लढत सुरु आहे. चेन्नईच्या गोलंदाजीपुढे मुंबईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. रोहित शर्माला एकही धाव काढता आली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईविरोधातही रोहित अपयशी ठरला. एकही धाव न काढता मुकेश चौधरीच्या चेंडूवर रोहित बाद झाला. यासह रोहित शर्माच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फंलदाजीसाठी आमंत्रित केले. पण चेन्नईच्या गोलंदाजांपुढे मुंबईच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. मुंबईचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित सर्मा एकही धाव न काढता बाद झाला. रोहित शर्मानंतर ईशान किशनही एकही धाव न काढता बाद झाला. शून्य धावसंख्येवर बाद झाल्यानंतर रोहितच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्येवर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झाला आहे.
रोहित शर्मा आयपीएलमध्ये 14 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाला. 2008 पासून आतापर्यंत रोहित शर्मा आयपीएलमध्ये 0 धावसंख्येवर 14 वेळा बाद झालाय. अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल, अंबाती रायडू, मनदीप सिंह, हरभजन सिंह आणि पीयूष चावला आयपीएलमध्ये 13 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाले आहेत.
चेन्नईची प्रथम गोलंदाजी
नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. महत्वाच्या सामन्यात मुंबईच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मुंबईने रायली मेरीडेथ, ह्रतिक शॉकिन आणि डॅनिअल सॅम यांना संघात संधी दिली आहे. रॅली मेरीडेथ हा वेगवान गोलंदाज आहे. तर ह्रतिक शॉकिन हा फिरकी गोलंदाज आहे. चेन्नईच्या संघातील डाव्या हाताचे फलंदाज असल्यामुळे मुंबईने शॉकिनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या सामन्यात चेन्नईने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. चेन्नईने मोईन अली आणि ख्रिस जॉर्नला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याजागी ड्वेन प्रिटोरियस आणि मिचेल सँटनेरला संधी देण्यात आली आहे.
चेन्नईचे 11 किंग्स कोण?
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा (कर्णधार), एम. एस धोनी (विकेटकिपर), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, डेवेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.
कसा आहे मुंबईचा संघ?
ईशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनिअल सॅम्स, रायली मेरेडेथ, ह्रतिक शॉकिन, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह.