IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये?
IPL 2022 Prize Money : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची फायनल 29 मे रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे.
IPL 2022 Prize Money : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची फायनल 29 मे रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने फायनलमध्ये धडक मारली आहे. राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ गुजरातसोबत लढणार आहे. रविवारी आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे. पण त्याआधीच क्रीडा चाहत्यांमध्ये बक्षिसांची चर्चा सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल विजेत्या संघाला गतवर्षी इतकी रक्कम देण्यात येणार आहे. त्याशिवाय ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, इमर्जिंग प्लेयर, ड्रीम 11 गेम चेंजर, पॉवर प्लेयर, मोस्ट व्हॅल्यूएबलसह इतर अनेक व्यक्तिगत पुरस्कार जिंकणारे खेळाडूही मालामाल होणार आहेत. (How Much money will IPL 2022 Winner get)
रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2022 चा चषक उंचावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरील संघाला (क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झालेला संघ) सात कोटी रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. तर चौथ्या क्रमांकावरील संघाला 6.5 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाचे 6.5 कोटी रुपयांचे बक्षिस निश्चित झालेय. कारण, एलिमेनटर सामन्यात त्यांचा पराभव झालाय.
आयपीएल 2022 नंतर कुणाला किती रक्कम मिळणार
Award | Prize Money (in rupees) |
पर्पल कॅप विजेता | 15 लाख |
ऑरेंज कॅप विजेता | 15 लाख |
सुपर स्ट्राईकर | 15 लाख |
Crack it sixes of the season | 12 लाख |
पॉवर प्लेयर | 12 लाख |
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर | 12 लाख |
गेम चेंजर | 12 लाख |
इमर्जिंग प्लेयर | 20 लाख |
परफेक्ट कॅच ऑफ द सीजन | 12 लाख |
सामनावीर (फायनल) | 5 लाख |
2008 पासून विजेत्या संघाला किती रक्कम दिली गेली?
IPL 2008 – 4.8 crore
IPL 2009 – 6 crore
IPL 2010 – 8 crore
IPL 2011 – 10 crore
IPL 2012 – 10 crore
IPL 2013 – 10 crore
IPL 2014 – 15 crore
IPL 2015 – 15 crore
IPL 2016 – 20 crore
IPL 2017 – 15 crore
IPL 2018 – 20 crore
IPL 2019 – 20 crore
IPL 2020 – 10 crore
IPL 2021 – 20 crore