IPL Points Table 2022 : आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर टॉपवर आहे राजस्थान रॉयल्स, कोणाकडे ऑरेंज आणि पर्पल कॅप?
IPL 2022 : आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 12 सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये कोणता संघ टॉपवर आहे. तसंच कोणाकडे सर्वाधिक धावा आणि विकेट्स आहेत, ते पाहूया...
IPL 2022 Purple Cap And Orange Cap : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या पर्वात (IPL 2022) एकापेक्षा एक चुरशीचे सामने होत आहेत. आतापर्यंत विविध संघामध्ये एकूण 11 सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सने एकूण तीन-तीन सामने खेळले आहेत. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद सोडता इतर संघानी त्यांचे दोन-दोन सामने उरकून घेतले आहेत.
टॉपवर आहे राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्हीमध्ये विजय मिळवला आहे. शिवाय त्यांनी उत्तम रनरेटने हे सामने जिंकल्याने त्यांनी पॉईंट्स टेबलमध्येही गरुडझेप घेतली आहे. राजस्थानचा नेट रन रेट सध्या सर्वांपेक्षा चांगला आहे. त्यांचा नेट रन रेट सध्या +2.100 इतका आहे. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे कोलकाता नाईट रायडर्स है. केकेआरने तीन सामन्यातील दोन सामने जिंकले आहेत. तिसऱ्या ,स्थानावर असणाऱ्या गुजरात टायटन्सचा नेट रनरेट +0.495 इतका आहे.
ईशान किशन आणि जोस बटलरमध्ये ऑरेंज कॅपसाठी चूरस
आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा विचार करता यामध्ये मुंबई इंडियन्सचा ईशान किशन आणि राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर दोघेही बरोबरीत आहेत. दोघांननी प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये 135 रन केले आहे. त्यांच्यानंतर शिवम दूबेचा नंबर लागत असून त्याने 109 रन केले आहेत.
उमेश यादवकडे पर्पल कॅप
पर्पल कॅप जी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूकडे असते, ती सध्या केकेआरच्या उमेश यादवकडे आहेत. त्याने तीन सामन्यांमध्ये आठ विकेट घेतले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा राहुल चाहर असून त्याने तीन सामन्यात सहा विकेट्स घेतले आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : चेन्नईचा कोच माइक हसीचं मोईन अलीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...
- IPL 2022, SRH vs LSG : लखनौसमोर आज हैदराबादचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- CSK vs PBKS: चेन्नईमधून 'या' खेळाडूला मिळाला डच्चू, पंजाबनेही दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha