IPL 2022: वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज सनरायझर्स हैदराबादच्या संघात सामील
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन हैदराबादच्या संघात सामील झालाय. सनरायझर्स हैदराबादनं निकोलस पूरनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत निकोसल पूरन आपल्या संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांबाबत बोलताना दिसत आहे.
निकोलस पूरन म्हणाले की, "मी गेल्या अनेक हंगामापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. हा काळ माझ्यासाठी अवस्मरणीय ठरलाय. यादरम्यान, या काळात मी बऱ्याच गोष्टी शिकलो. मुंबईपासून मी आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि आता सनरायझर्स हैदराबादपर्यंत पोहचलो. हैदराबादच्या संघात संधी मिळण्यासाठी मी उस्तुक आहे. हैदराबादकडून खेळताना संघासाठी चांगलं योगदान देण्याचं प्रयत्न करेल, असंही निकोलस पूरननं म्हटलं आहे.
पुढे निकोलस पूरन म्हणाला की, माझं ब्रायन लारा आणि इतर प्रशिक्षकांसोबत बोलण झालंय. मी संघातील इतर सदस्यांनाही भेटण्यासाठी खूप उस्तुक आहे. आशा करतो की, अप्रतिम होण्याची सुरुवात आहे, असं त्यानं म्हटलंय. ब्रायन लारा यांच्याबाबत बोलताना निकोलस पूरन म्हणाला की, ब्रायन लारा जगातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहेत. माझी आणि त्यांची भेट झाल्यास मी त्यांना खूप प्रश्न विचारणार असल्याचं त्यांनं म्हटलंय.
आयपीएलच्या पंधरावा हंगाम आणखी रंगतदार होणार
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चला सुरुवात होणार आहे. तर, 29 मे ला अंतिम सामना खेळला जाणार आहे. आयपीएलचा पहिला सामना कोलाकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना चाहत्यांना निराश करणारी माहिती समोर आलीय. चीन, दक्षिण कोरियासह युरोपियन देशांत कोरोचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं केंद्र सरकारनं महाराष्ट्राला सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास यंदाचा हंगामही प्रेक्षकांविना खेळला जाईल.
हे देखील वाचा-
- IPL 2022, Gujrat Titans : पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज, हार्दिकच्या टोळीची काय ताकद? काय कमजोरी?
- IPL 2022: यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट, सर्व सामने प्रेक्षकांविनाच?
- Maldives Sports Awards 2022: सुरेश रैनाची स्पोर्ट्स आयकॉन म्हणून निवड, 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मागं टाकत मिळवला सन्मान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha