(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC vs PBKS : सामन्याला काही तास शिल्लक असताना दिल्ली संघात नवा कोरोनाबाधित; आणखी एका परदेशी खेळाडूला कोरोनाची लागण
काही दिवसांपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ऑलराऊंडर मिशेल मार्शची (Mitchell Marsh) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) आली होती आता आणखी एका परदेशी खेळाडूला कोरोना झाला आहे.
Covid Outbreak in IPL : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामावर देखील कोरोनाचं सावट घोंगावत असून दिल्ली संघातील कोरोनाची बाधा वाढतच आहे. नुकत्याच आणखी एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. PTI च्या वृत्तानुसार या खेळाडूचं नाव टीम सायफर्ट असून टीम न्यूझीलंडचा खेळाडू असून संध्या अष्टपैलू खेळाडू म्हणून दिल्ली संघाकडून खेळतो. दिल्लीच्या मिचेल मार्शसह स्टाफमधील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे सामना पुण्याऐवजी मुंबई घेणार असल्याचा निर्णय़ घेतला होता. आज हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडण्यापूर्वीच आणखी एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
दिल्ली संघाच्या पंजाब किंग्ससोबत होणाऱ्या आजच्या अर्थात बुधवार 20 एप्रिल रोजीच्या सामन्याचं ठिकाण पुण्यावरुन बदलून मुंबई करण्यात आलं. आधी हा सामना पुण्याच्या एमसीए मैदानात (MCA Stadium) होणार होता. पण आता हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न (Brabourne) मैदानात पार पडणार आहे. मंगळवारी बीसीसीयने याबाबतची माहिती दिली होती. त्याचवेळी कोरोनाबाधित सर्व रुग्णांना सध्या विलगीकरणात आणि देखरेखीखाली ठेवण्यात येणारक असून सर्व संघाच्या आणि स्टाफच्या दररोज आरटीपीसीआर (RT-PCR) टेस्ट होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.19 एप्रिल रोजी झालेल्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या पण आता सामन्याच्या काही तासांपूर्वी एका खेळाडूची टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे.
सामना होणार
दरम्यान संघातील दोन खेळाडू सद्यस्थितीला कोरोनाबाधित असले तरी इतर ज्या खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यांना घेऊन सामना होणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पंजाब विरुद्ध ब्रेबॉर्न मैदानावर पार पडणारा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
हे देखील वाचा-
- DC vs PBKS, IPL 2022 : दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएलच्या सामन्यात बदल; पुण्याऐवजी मुंबईत होणार सामना
- RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार
- Mitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल