IPL 2022, MI vs RR LIVE Updates : राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय

MI vs RR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबईला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आज मुंबईचा संघ त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयलविरुद्ध खेळणार आहे.

abp majha web team Last Updated: 02 Apr 2022 07:29 PM
 IPL 2022: राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय

राजस्थानच्या संघानं मुंबईला धावांनी पराभूत केलं आहे. हा राजस्थानचा दुसरा विजय तर, मुंबईचा दुसरा पराभव आहे.

MI Vs RR: मुंबईला चौथा झटका, एम. अश्विनच्या गोलंदाजीवर तिलक वर्मानं विकेट्स गमावली

मुंबईच्या संघाला चौथा झटका बसलाय. एम. अश्विनच्या गोलंदाजीवर तिलक वर्मानं विकेट्स गमावली. तिलक वर्मानं 33 चेंडूत 61 धावा केल्या आहेत. 

MI Vs RR: मुंबईच्या संघाला मोठा धक्का, ईशान किशन बाद

मुंबईच्या संघानं दोन विकेट्स गमवल्यानंतर संयमी खेळी दाखवत ईशान किशननं आपल्या आयपीएलच्या कारकिर्दित आणखी एका अर्धशतकाची भर टाकली. मात्र, त्यानंतर ट्रेन्ट बोल्टनं त्याला बाद करून मुंबईच्या संघाला तिसरा झटका दिलाय. 


 

IPL 2022: ईशान किशनचं अर्धशतक

मुंबईच्या संघानं झपपट दोन विकेट्स गमावल्यानंतर ईशान किशननं अर्धशतकी खेळी केली आहे. मुंबईच्या संघाला विजयासाठी 46 चेंडूत 80 धावांची गरज  आहे. 


 


 


 

ईशान किशन आणि तिलक वर्मानं संघाचा डाव सावरला

राजस्थानविरुद्ध सामन्यात मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर अनमोलप्रीत सिंहदेखील स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्मानं मुंबईच्या संघाचा डाव सावरला आहे. 

मुंबईची दुसरी विकेट्स पडली, अनमोलप्रीत सिंहची निराशाजनक कामगिरी, पाच धावा करून माघारी परतला

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पाठोपाठ अनमोलप्रीत सिंहनंही आपली विकेट्स गमावली आहे. ईशांन किशन आणि तिलक वर्मा मैदानात उपस्थित आहेत. 

मुंबईच्या डावाची सुरुवात

राजस्थानच्या संघानं दिलेल्या 194 लक्ष्याचा पाठलाग करण्याठी मुंबईचा संघ मैदानात उतरला आहे.

राजस्थानचं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

IPL 2022: जॉस बटलरचं शतकं पूर्ण! 

मुंबईविरुद्ध आज सुरू असलेल्या सामन्यात राजस्थानचा फलंदाज जॉस बटलरनं शतक पूर्ण केलं आहे. 

IPL 2022: राजस्थानला तिसरा झटका, संजू सॅमसन माघारी परतला

राजस्थानच्या संघाला तिसरा झटका लागला असून कर्णधार संजू सॅमसन 21 चेंडूत 30 धावा करून बाद झालाय. 


 

जॉस बटलरचं अर्धशतक

मुंबईच्या डीवाय पाटील स्डेटीवर सुरु असलेल्या मुंबईच्या संघाविरुद्ध राजस्थानचा फलंदाज जॉस बटलरनं अर्धशतक केलं आहे.

MI Vs RR: जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलनं संघाचा डाव सावरला

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैयस्वाल बाद झाल्यानंतर जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलनं संघाचा डाव सावरला आहे. राजस्थानचा स्कोर 5 ओवर 46/1


 

MI Vs RR: राजस्थान रॉयल्सला पहिला झटका, यशस्वी जैयस्वाल बाद

मुंबई विरुद्ध सुरु असेलल्या सामन्यात राजस्थानच्या यशस्वी जयस्वालला मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं आहे. टीम डेव्हिडच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली आहे. 

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: मुंबई इंडियंसचा संघ :

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बसील थम्पी

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: मुंबई इंडियंसचा संघ :

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बसील थम्पी

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IPL 2022, MI vs RR Match LIVE Updates: मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थानची प्रथम फलंदाजी असणार आहे. 





राजस्थानचा संभाव्य संघ

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल/जेम्स नीशम, युझवेंद्र चहल, ट्रेंट कृष्णा बोल्ट, प्रशांत.

IPL 2022: मुंबईचा संभाव्य संघ, धाकड फलंदाजाची संघात एन्ट्री होण्याची शक्यता

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.

पार्श्वभूमी

MI vs RR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबईला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आज मुंबईचा संघ त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयलविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघात उत्कृष्ट खेळाडू असल्यानं आजचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थाननं पहिला सामना जिंकल्यानंतर संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरेल, हे  मुंबईसाठी मोठं आव्हान असेल. 


हेडू टू हेड रेकॉर्ड
मुंबईनं पाच वेळा आयपीएलचे खिताब जिंकले आहेत. तर, राजस्थानच्या संघानं आयपीएलच्या पहिल्या हंगामात ट्रॉफी जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शेनवार्नच्या नेतृत्वात राजस्थाननं ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर राजस्थानच्या संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत आयपीएलचे 27 सामने खेळण्यात आले आहेत. यातील 14 मुंबईनं तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं विजय मिळवला आहे. या दोघांमधील एकच सामना अनिर्णित ठरला होता. या दोघांमधील सामन्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यंदाचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना?
मुंबई आणि राजस्थान यांच्यातील IPL-2022 मधला सामना शनिवार, 2 एप्रिल रोजी खेळवला जाईल. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यासाठी दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे. तर, 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.  मुंबई आणि राजस्थान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह Disney+Hotstar वर सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/news/sports वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.


मुंबईचा संघ- 
रोहित शर्मा , जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बसिल थम्पी, मुरुगन आश्विन, जयदेव उनाडकट, मयांक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स , टिमल मिल्स, टीम डेव्हिड, रिले मरेडिथ, मोहम्मद अर्शद खान.  


राजस्थान संघ-
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रवीचंद्रन आश्विन, ट्रेण्ट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिध कृष्णा, युजवेंद्र चहल, पराग रियान, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, महिपाल लोमरोर , ओबेद मेकॉय, चामा मिलिंद, अनुनयसिंह.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.