MI vs LSG, Match Live Update : मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनौचा 18 धावांनी विजय

IPL 2022 : आज पार पडणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमध्ये पार पडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2022 07:26 PM
MI vs LSG : मुंबईला 6 चेंडूत 26 धावांची गरज

मुंबईला अखेरच्या 6 चेंडूत 26 धावांची गरज आहे.

MI vs LSG : 6,4, 4 उनाडकट ON Fire

उनाडकट उत्तम फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने जेसन होल्डरला एक षटकार आणि दोन चौकार ठोकले आहेत.

MI vs LSG : मुंबईचा सहावा गडी बाद

मुंबई इंडियन्सचा विजय आता जवळपास अशक्य दिसत आहे. आवेश खानने फेबियन एलनला झेलबाद केलं आहे.

MI vs LSG : मुंबईला मोठा झटका, सूर्या बाद

मुंबईच्या विजयाच्या आशा जवळपास मावळत आहेत. कारण त्यांचा अखेरची आशा सूर्यकुमार यादवही तंबूत परतला आहे. 37 धावा करुन तो बाद झाला आहे.

MI vs LSG : 30 चेंडूत 75 धावांची गरज

मुंबईला विजयासाठी अखेरच्या पाच षटकात 75 धावांची गरज आहे.

MI vs LSG : तिलक वर्माची खेळी संपुष्टात

मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा तिलक मर्मा त्रिफळाचीत झाला आहे. जेसनने एक अप्रतिम बॉल टाकत त्याला बाद केलं आहे.

MI vs LSG : मुंबईचं शतक पूर्ण, विजयासाठी 100 धावांची गरज

मुंबईचा स्कोर 12 षटकानंतर 104 झाला असून आता त्यांना 8 षटकात 96 धावांची गरज आहे.

MI vs LSG : मुंबईचा तिसरा गडी बाद, ईशान किशन तंबूत परत

डिवाल्ड ब्रेव्हिस 31 धावांवर बाद झाल्यानंतर 13 धावा करुन ईशानही तंबूत परतला आहे.

IPL 2022: मुंबईनं दुसरी विकेट्स गमावली

लखनौच्या संघानं दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलल्या मुंबईच्या संघाची खराब सुरुवात झाली आहे. मुंबईनं पावर प्लेमध्ये 57 दोन विकेट्स गमावल्या आहेत.

MI vs LSG : मुंबईला मोठा झटका, कर्णधार बाद

अवघ्या सहा धावा करुन रोहित शर्मा तंबूत परतला आहे. आवेश खानने त्याला बाद केलं आहे.

MI vs LSG : मुंबईच्या डावाची सुरुवात, रोहित- ईशान मैदानात

लखनौच्या संघानं दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरले आहेत.

MI vs LSG : मुंबईला विजयासाठी 200 धावांचं आव्हान

अखेरच्या षटकात जयदेवने भेदक गोलंदाजी करत केवळ चार धावा दिल्याने 200 च्या आत लखनौ संघाला रोखण्यात मुंबईला यश आलं आहे. 199 धावा झाल्याने आता विजयासाठी 200 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे.

MI vs LSG : केएल राहुलचं शतक पूर्ण

यंदाच्या आयपीएलमध्ये खास फॉर्ममध्ये दिसत नसलेल्या राहुलने आज मात्र सगळ्यांची बोलती बंद केली असून त्याने शतक पूर्ण केलं आहे. त्याने 56 चेंडूत शतक पूर्ण केलं आहे.

MI vs LSG : मार्कस स्टॉयनिस तंबूत परत

क्रिजवर येताच षटकाराने सुरुवात करणारा मार्कस केवळ 10 धावा करुन बाद झाला आहे. जयदेव उनाडकटने त्याची विकेट घेतली आहे.

MI vs LSG : स्टॉयनिस-राहुलची फटकेबाजी, 150 धावा पूर्ण

लखनौकडून दमदार फलंदाजी सुरु असून स्टॉयनिस-राहुल फटकेबाजी करत आहेत.

MI vs LSG : आश्विनची फिरकी, मनिष पांडे बाद

लखनौची एक शतकी भागिदारी तोडण्यात एम. आश्विनला यश आलं आहे. मनिष पांडे 38 धावा करुन त्रिफळाचीत झाला आहे.

MI vs LSG : टायमलची महागडी ओव्हर

टायमल मिल्सने फेकलेल्या 13 व्या षटकात 4 चौकार गेले असून 18 धावा आल्या आहेत.

MI vs LSG : कर्णधार केएल राहुलचं अर्धशतक पूर्ण

कर्णधार म्हणून एक दमदार खेळी करणाऱ्या केएलने नुकतंच अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने 33 चेंडूत 51 धावा ठोकल्या आहेत.

MI vs LSG : 8 षटकानंतर लखनौ 74/1

दोन सलग मिसफिल्डमुळे मुंबईला दोन चौकार लगावण्यात लखनौला यश आलं आहे. ज्यामुळे 8 षटकानंतर मुंबईचा स्कोर 74 वर एक बाद झाला आहे.

लखनौ अंतिम 11   

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.


 

MI vs LSG, Match Live Update : लखौनाला पहिला धक्का, फॅबिअन अॅलनने डिकॉकला केलं बाद

MI vs LSG, Match Live Update :  पॉवरप्लेच्या सहा षटकासाठी मुंबईने सहा गोलंदाजांचा वापर केला. सहाव्या षटकात फॅबिअन अॅलन याने डिकॉकला पायचीत बाद करत मुंबईला पहिलं यश मिळवून दिले. डिकॉक 24 धावांवर बाद झाला.

MI vs LSG, Match Live Update : राहुल-डिकॉकची दमदार सुरुवात

MI vs LSG, Match Live Update : नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि डिकॉक यांनी दमदार सुरुवात केली आहे. चार षटकात लखनौनं बिनबाद 30 धावा केल्या आहेत. 

मुंबई अंतिम 11  

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डी. ब्रेविस, फेबियन अॅलन, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट

MI vs LSG : मुंबईने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

स्पर्धेतील सहावा सामना खेळणाऱ्या मुंबईने आज नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौ संभाव्य अंतिम 11   

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, के. गौथम, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.

मुंबई संभाव्य अंतिम 11  

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डी. ब्रेविस, फेबियन अॅलन, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.   

MI vs LSG : आजचा सामना मुंबई विरुद्ध लखनौै

सलग पाच सामने गमावलेल्या मुंबईसमोर आज लखनौचे आव्हान असणार आहे.

पार्श्वभूमी

MI vs LSG, Live Score : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 26 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्सने (MI vs LSG) या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात मुंबईला पाच पैकी पाच सामने गमवावे लागले असल्याने त्यांना आजतरी विजयाचं खातं उघडता येणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे लखनौने पाच पैकी तीन जिंकले असल्याने त्याचा फॉर्म बऱ्यापैकी चांगला दिसत आहे. त्यामुळे आजचा सामना कुणाच्या दिशेने झुकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईतील सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळवला जाणार आहे. सामना मुंबईत त्यात दुपारच्या सुमारास असल्याने हवामान उष्ण असणार आहे. त्यामुळे दवाची अडचण अधिक येणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दवामुळे आजच्या सामन्याचा विजेता ठरला जाणार नसून दमदार खेळी करणारा संघच आज विजय मिळवेल. 


मुंबई संभाव्य अंतिम 11  


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डी. ब्रेविस, फेबियन अॅलन, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.   


लखनौ संभाव्य अंतिम 11   


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, के. गौथम, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.