Chhagan Bhujbal on Ajit Pawar : शनिवारी राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पत्ता कट करण्यात आला. बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडचे पालकत्व (Beed Guardian Minister) स्वीकारावे, अशी मागणी केली जात होती. अखेर अजित पवार यांना बीडचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डीत सुरु आहे. या अधिवेशनाला गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी शनिवारी हजेरी लावली. मात्र काही वेळातच छगन भुजबळ अधिवेशन सोडून मुंबईकडे रवाना झाले. आज माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया
काही नेत्यांना पालकमंत्रिपदातून डावलण्यात आले. यामुळे नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मला काही माहीत नाही. नक्की कोण नाराज आहे. मी कालच यादी वाचली असं त्यांनी म्हटले. तर बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी घेतले आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. याबाबत विचारले असता चांगली गोष्ट आहे, अशी तीन शब्दात प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, पार्टीचे पार्लमेंटरी बोर्ड तयार झाले पाहिजे. त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजे. विशेषतः जे आमदार आणि खासदारांच्या उमेदवारीचे निर्णय घेतले गेले पाहिजे. आता महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. ज्या कमिटी स्थापित केल्या जातील. त्यावर योग्य निवड झाली पाहिजे. चारही बाजूंनी विचार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा