IPL 2022, KKR vs SRH : आजची लढत कोलकाता विरुद्ध हैदराबाद; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : आजचा सामना हैदराबादसाठी अधिक महत्त्वाचा असून त्यांना पुढील फेरीत एन्ट्रासाठी विजय मिळवनं अनिवार्य आहे.
KKR vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 60 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs sunrisers hyderabad) या संघामध्ये पार पडणार आहे. कोलकाता संघाने यंदाच्या हंगामात 12 पैकी 7 सामने गमावल्याने त्याचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. तर हैदराबाद संघाने मात्र 11 पैकी 5 सामने जिंकत सहावं स्थान मिळवलं आहे.
कोलकात्याची पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. पण हैदराबादने त्यांच्यापेक्षा कमी सामने खेळले असल्याने आजचा विजय त्याचं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवू शकतो. त्यामुळे आजच्या विजयासाठी ते पूर्ण प्रयत्न करतील. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याने आजचा सामना चुरशीचा होणार यात शंका नाही. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 14 मे रोजी होणारा कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
- IPL 2022: 'मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडं कपडे नव्हते, टॉवेलवर दोन-तीन दिवस काढले' रोव्हमन पॉवेलनं ऐकवला तो किस्सा
- CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?