KKR vs SRH, Match Live Updates : कोलकात्याचा हैदराबादवर दणदणीत विजय

KKR vs SRH, Match Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात (Knight Riders vs Sunrisers Hyderabad) आयपीएल 2022 चा 61 सामना खेळला जाणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 May 2022 11:22 PM
कोलकात्याचा हैदराबादवर दणदणीत विजय

आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला. 

हैदराबादला आठवा धक्का, शशांक सिंह

शशांक सिंहच्या रुपाने हैदराबादला आठवा धक्का बसला... शशांक सिंह 11 धावांवर बाद झाला

हैदराबादला सातवा धक्का, जानसेन बाद

रसेलने जेनसेनला बाद करत हैदराबादला सातवा धक्का दिला

हैदराबादला सहावा धक्का, सुंदर बाद

 


आंद्रे रसेलने वॉशिंगट सुंदरला बाद करत कोलकात्याला सहावे यश मिळवून दिले.. सुंदर चार धावांवर बाद झाला. 

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत, धोकादायक मार्करम बाद

उमेश यादवने मार्करमला बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. मार्करम 32 धावा काढून बाद झाला

हैदराबादला चौथा धक्का, पूरन बाद

निकोलस पूरनला बाद करत नारायण याने हैदराबादला चौथा धक्का दिला. हैदराबाद चार बाद 76 धावा.

KKR vs SRH, Match Live Updates : हैदराबादला तिसरा धक्का, अभिषेक शर्मा बाद

 KKR vs SRH, Match Live Updates : अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला तिसरा धक्का बसला आहे, तो 43 धावा काढून बाद झाला.. 

 हैदराबादचे फलंदाज मैदानात

कोलकात्याने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादचे सलामी फंलदाज मैदानात... अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन फलंदाजीसाठी मैदानात.. तर उमेश यादव टाकणार पहिले षटक

कोलकात्याची 177 धावांपर्यंत मजल

आंद्रे रसेलच्या 49 धावांच्या जोरावर कोलकाताने निर्धारित 20 षटकात 177 धावांपर्यंत मजल मारली आहे. 

मोक्याच्या क्षणी कोलकात्याला सहावा धक्का

मोक्याच्या क्षणी कोलकात्याला सहावा धक्का बसला आहे. सॅम बिलिंग्स 34 धावा काढून बाद झाला. 

कोलकात्याच्या 150 धावा पूर्ण

कोलकात्याने 150 धावांचा टप्पा पार केलाय. 

कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत

कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत परतलाय... रिंकू सिंह पाच धांवावर बाद झालाय...

KKR vs SRH, Match Live Updates : कर्णधार श्रेयस तंबूत, उमरान मलिकचा कोलकात्याला चौथा धक्का

 KKR vs SRH, Match Live Updates : उमरान मलिकने कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करत हैदराबादला चौथं यश मिळवून दिले..मलिकचे हे तिसरे यश

कोलकात्याला आणखी एक धक्का, उमरान मलिकने रहाणेला केले बाद

उमरान मलिकने अंजिक्य रहाणेला 28 धावांवर बाद करत हैदराबादला तिसरे यश मिळवून दिले. नीतीश राणा याच्यानंतर रहाणेही माघारी परतला..

उमरानचा कोलकात्याला दुसरा धक्का, नीतीश राणा बाद

उमरान मलिक याने नीतीश राणाला बाद करत कोलकात्याला दुसरा धक्का दिला. नितीश राणा 26 धावा काढून बाद झाला.. कोलकाता दोन बाद 65 धावा.

राणाची फटकेबाजी, रहाणेचा संयम, कोलकात्याचं अर्धशतक

नीतीश राणाची फटकेबाजी आणि अजिंक्य राहणेची संयमी फलंदाजीच्या बळावर कोलकात्याने 6 षटकात अर्धशतक केले आहे. 

कोलकात्याला पहिला धक्का, वेंकटेश अय्यर बाद

दुसऱ्याच षटकात कोलकात्याला मोठा धक्का बसला... मार्के जानसेन याने वेंकटेश अय्यरचा अडथळा दूर केला. वेंकटेश अय्यर 7 धावा काढून बाद झाला.

सामन्याला सुरुवात 

वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. भुवनेश्वर कुमार पहिले षटक टाकतोय.
 

KKR vs SRH, Match Live Updates : कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

 KKR vs SRH, Match Live Updates : कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरचा हा 100 वा आयपीएल सामना आहे. 

कोलकाता विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद (KKR vs SRH) हे संघ 22 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.

KKR Vs SRH: सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, एफ. फारुकी, उमरान मलिक.

KKR Vs SRH: कोलकाता नाइट राइडर्स संभाव्य प्लेईंग इलेव्हन

अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसल, सुनील नरायण, शेल्डन जॅक्सन/सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), उमेश यादव, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती.

100 वा सामना खेळण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज

आयपीएलच्या कारकिर्दितील 100 वा सामना खेळण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर फक्त दोनच संघाकडून खेळला आहे. दिल्लीच्या संघाकडून त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तर, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकात्याच्या संघानं त्याला विकत घेतलं. श्रेयसची आतापर्यंतची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. मात्र, यादरम्यान त्याला अनेक चढ-उतार पाहावा लागले.

कोलकात्यासाठी प्लेऑफचं समीकरण कसं असेल?

- कोलकात्याचा संघ आज हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर त्यांचा या हंगामातील अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या रनरेटनं विजय मिळवणं गरजेचं आहे. 


- आरसीबी त्यांच्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली पाहिजे. या पराभवानमुळं आरसीबीचे 14 गुण होतील.




 



- दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत होणं गरजेचं आहे. दिल्लीचे पुढील दोन सामने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहे. 


- पंजाब किंग्जलाही त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव होणं कोलकात्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. पंजाब त्यांचे पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबादशी खेळणार आहे. 

पार्श्वभूमी

KKR vs SRH, Match Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात (Knight Riders vs Sunrisers Hyderabad) आयपीएल 2022 चा 61 सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.  यंदाच्या हंगामात कोलकात्याच्या संघानं 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, सात सामने गमावले आहेत. दुसरीकडं हैदाबादच्या संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत आणि सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर, कोलकात्याचा संघ आठव्या स्थानावर आहे. 


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकात्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर कोलकात्याला सलग 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं. कोलकात्यानं मुंबईविरुद्ध त्यांच्या अखेरचा सामना जिंकला आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकात्यानं 52 धावांनी विजय मिळवला. तरी आज हैदराबादविरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले होते. या सामन्यात सॅम बिलिंग्स किंवा शेल्डन जॅक्सनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जॅक्सन खेळला होता. 


पीच रिपोर्ट
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या मैदानावरील आकडेवारीवर नजर टाकल्यास मागील 12 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जास्त विजय मिळवला आहे. या मैदानावर हैदराबादनं ५ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. यामुळं आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.


कोलकात्यासाठी प्लेऑफचं समीकरण कसं असेल?
- कोलकात्याचा संघ आज हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर त्यांचा या हंगामातील अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या रनरेटनं विजय मिळवणं गरजेचं आहे. 


- आरसीबी त्यांच्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली पाहिजे. या पराभवानमुळं आरसीबीचे 14 गुण होतील.




 



- दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत होणं गरजेचं आहे. दिल्लीचे पुढील दोन सामने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहे. 


- पंजाब किंग्जलाही त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव होणं कोलकात्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. पंजाब त्यांचे पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबादशी खेळणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.