एक्स्प्लोर

KKR vs SRH, Match Live Updates : कोलकात्याचा हैदराबादवर दणदणीत विजय

KKR vs SRH, Match Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात (Knight Riders vs Sunrisers Hyderabad) आयपीएल 2022 चा 61 सामना खेळला जाणार आहे.

LIVE

Key Events
KKR vs SRH, Match Live Updates : कोलकात्याचा हैदराबादवर दणदणीत विजय

Background

KKR vs SRH, Match Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात (Knight Riders vs Sunrisers Hyderabad) आयपीएल 2022 चा 61 सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.  यंदाच्या हंगामात कोलकात्याच्या संघानं 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, सात सामने गमावले आहेत. दुसरीकडं हैदाबादच्या संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत आणि सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर, कोलकात्याचा संघ आठव्या स्थानावर आहे. 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकात्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर कोलकात्याला सलग 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं. कोलकात्यानं मुंबईविरुद्ध त्यांच्या अखेरचा सामना जिंकला आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकात्यानं 52 धावांनी विजय मिळवला. तरी आज हैदराबादविरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुंबईविरुद्ध सामन्यात कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले होते. या सामन्यात सॅम बिलिंग्स किंवा शेल्डन जॅक्सनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जॅक्सन खेळला होता. 

पीच रिपोर्ट
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या मैदानावरील आकडेवारीवर नजर टाकल्यास मागील 12 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जास्त विजय मिळवला आहे. या मैदानावर हैदराबादनं ५ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. यामुळं आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.

कोलकात्यासाठी प्लेऑफचं समीकरण कसं असेल?
- कोलकात्याचा संघ आज हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर त्यांचा या हंगामातील अखेरचा सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे. या दोन्ही सामन्यात कोलकात्याला मोठ्या रनरेटनं विजय मिळवणं गरजेचं आहे. 

- आरसीबी त्यांच्या पुढील सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाली पाहिजे. या पराभवानमुळं आरसीबीचे 14 गुण होतील.

- दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभूत होणं गरजेचं आहे. दिल्लीचे पुढील दोन सामने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहे. 

- पंजाब किंग्जलाही त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव होणं कोलकात्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. पंजाब त्यांचे पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबादशी खेळणार आहे. 

23:22 PM (IST)  •  14 May 2022

कोलकात्याचा हैदराबादवर दणदणीत विजय

आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला. 

23:14 PM (IST)  •  14 May 2022

हैदराबादला आठवा धक्का, शशांक सिंह

शशांक सिंहच्या रुपाने हैदराबादला आठवा धक्का बसला... शशांक सिंह 11 धावांवर बाद झाला

23:06 PM (IST)  •  14 May 2022

हैदराबादला सातवा धक्का, जानसेन बाद

रसेलने जेनसेनला बाद करत हैदराबादला सातवा धक्का दिला

23:03 PM (IST)  •  14 May 2022

हैदराबादला सहावा धक्का, सुंदर बाद

आंद्रे रसेलने वॉशिंगट सुंदरला बाद करत कोलकात्याला सहावे यश मिळवून दिले.. सुंदर चार धावांवर बाद झाला. 

22:48 PM (IST)  •  14 May 2022

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत, धोकादायक मार्करम बाद

उमेश यादवने मार्करमला बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. मार्करम 32 धावा काढून बाद झाला

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget