SRH vs RCB, Toss Update : नाणेफेक जिंकत बंगळुरुचा 'बोल्ड' निर्णय, प्रथम फलंदाजी करणार; पाहा आजची अंतिम 11
रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे.
SRH vs RCB : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 54 वा सामना आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (SRH vs RCB) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दुपारच्या सुमारास असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येणार नसल्याने बंगळुरुने हा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभारुन हैदराबादवर दबाव आणण्याची रणनीती बंगळुरुची असेल.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता बंगळुरु संघाने एकही बदल न करता मागील सामन्यात खेळवलेला तोच संघ आजही खेळवला आहे. तर हैदराबाद संघाने मात्र दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. सीन एबॉट आणि श्रेयस गोपाल यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी अफगाणिस्तानचा एफ. फारुकी आणि जे. सुचित यांना संधी देण्यात आली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
हैदराबाद अंतिम 11
केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मारक्रम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, एफ. फारुकी, कार्तिक त्यागी, उमरान मलिक
बंगळुरु अंतिम 11
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
हे देखील वाचा-