(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs MI, Toss Update : नाणेफेक जिंकत रोहितनं निवडली गोलंदाजी; मुंबईचा दिग्गज खेळाडू संघाबाहेर, पाहा आजची अंतिम 11
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला असून संघातही काही मोठे बदल केले आहेत. विशेष म्हणजे पोलार्डही विश्रांतीवर असून त्याच्या जागी एका नव्या खेळाडूला संधी दिली आहे.
CSK vs MI : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 59 वा सामना आहे. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकत 8 गुणांसह नववं स्थान मिळवलं आहे. तर मुंबई 11 पैकी 9 सामन्यात पराभूत होत दहाव्या स्थानावर आहे. दोघांची कामगिरी खास नसल्याने आज अस्तित्त्वाच्या लढाईत कोण जिंकणार? हे पाहावं लागेल.
आजच्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाच्या अंतिम 11 खेळाडूंचा विचार करता चेन्नईने संघात एकही बदल केलेला नाही. तर मुंबईने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. विशेष म्हणजे मुंबईने त्यांचा स्टार खेळाडू केईरॉन पोलार्डला विश्रांती दिली असून त्याच्या जागी युवा खेळाडू ट्रीस्टन स्टब्सला संधी दिली आहे. तसचं ऋतिक रोशनला मुरुगन आश्विनला संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
चेन्नई अंतिम 11
रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सीमरजीत सिंह.
मुंंबई अंतिम 11
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, ट्रीस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, रमनदीप सिंह, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, ऋतिक रोशन, रिले मॅरिडथ, कुमार कार्तिकेय
हे देखील वाचा-
- Most wickets in IPL: आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?