GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईचा गुजरातवर विजय
GT vs MI Live Score, IPL 2022 : टेबल टॉपर गुजरात टायटन्सचा सामना तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे.
डॅनिअल सॅम्सच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने गुजरातचा पराभव केला.
GT vs MI Live Score, IPL 2022 : राहुल तेवातियाच्या रुपाने गुजरातला पाचवा धक्का बसला. तेवातिया दोन धावा काढून बाद झाला.
GT vs MI Live Score, IPL 2022 : मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या धावबाद झाला. पांड्या 24 धावा काढून माघारी परतला
GT vs MI Live Score, IPL 2022 : पोलार्डच्या चेंडूवर साई दुसर्शन हिट विकेट बाद झाला.. साई सुदर्शन 14 धावा काढून बाद झाला
GT vs MI Live Score, IPL 2022 : गुजरातला लागोपाठ दोन धक्के, शुभम गिल पाठोपाठ वृद्धिमान साहा बाद, 14 षटकानंतर गुजरातच्या दोन बाज 121 धावा
GT vs MI Live Score, IPL 2022 : वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलची तुफानी खेळी, नऊ षटकानंतर गुजरातच्या बिनबाद 88 धावा झाल्या आहेत.
GT vs MI Live Score, IPL 2022 : 178 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरात संघाने संयमी सुरुवात केली आहे. चार षटकात बिनबाद 30 धावा केल्या आहेत. गिल आणि साहा खेळत आहेत.
GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी गुजरातचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. गिल आणि साहा फलंदाजीसाठी मैदानात
GT vs MI Live Score, IPL 2022 : कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची वादळी सुरुवात त्यानंतर टीम डेविडच्या फिनिशिंग टचच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 43,ईशान किशन 45 आणि टीम डेविड 44 धावांची खेळी केली. गुजरातला विजयासाठी 178 धावांचे आव्हान देण्यात आलेय.
GT vs MI Live Score, IPL 2022 : डॅनिअल सॅम्सच्या रुपाने मुंबईला सहावा धक्का बसला... लॉकी फर्गुसनने सॅम्सला शून्यावर बाद केले.
GT vs MI Live Score, IPL 2022 : तिलक वर्माच्या रुपाने मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. तिलक वर्मा 21 धावांवर बाद झाला.
GT vs MI Live Score, IPL 2022 : कायरन पोलार्डला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. पोलार्ड 14 चेंडूत 4 धावा काढून बाद झाला
GT vs MI Live Score, IPL 2022 : अलझारी जोसेफने ईशान किशनला बाद करत गुजरातला मोठं यश मिळवून दिलेय. ईशान किशन 45 धावांवर बाद झाला
GT vs MI Live Score, IPL 2022 : प्रदिप सांगवान याने सूर्यकुमार यादवला राशिद खानकरवी झेलबाद करत गुजरातला दुसरे यश मिळवून दिले. सूर्यकुमार यादव 13 धावांवर बाद झाला.
GT vs MI Live Score, IPL 2022 : रोहित शर्माच्या रुपाने मुंबईला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा 43 धावांवर बाद झाला. रोहित शर्माला राशिद खानने तंबूचा रास्ता दाखवला.
GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने गुजरातविरोधात वादळी खेळी केली. रोहित शर्मा 42 धावांवर खेळत आहे.
GT vs MI Live Score, IPL 2022 : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फंलदाजी करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी जमली.. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडलाय
GT vs MI Live Score, IPL 2022 : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या(कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्यूसन, अलजारी जोसेफ, मोहम्मद शमी
GT vs MI Live Score, IPL 2022 : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरेडेथ
GT vs MI Live Score, IPL 2022 : गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आलाय. मुंबईने ह्रतिक शौकीनच्या जागी एम. अश्विनला स्थान दिलेय.. मुंबईच्या संघात आजही अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही.
GT vs MI Live Score, IPL 2022 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामन्याबाबत बोलताना सेहवागने मोठं वक्तव्य केले आहे. या सामन्यात सर्व दिग्गज खेळाडूंना आराम मिळायला हवा, असं मत वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केलेय. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना आराम द्यावा, असा सल्ला वीरेंद्र सेहवागने मुंबईला दिलाय. एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना सेहवाग म्हणाला की, "मुंबईने सर्व सिनिअर खेळाडूंना आराम देण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही. मुंबईने पुढील हंगामासाठी तयारी सुरु करायला हवी. बेंच स्ट्रेंथ तपासण्यासाठी रोहित शर्मा, पोलार्ड आणि बुमराह यासारख्या खेळाडूंना आराम देण्याची गरज आहे."
GT vs MI Live Score, IPL 2022 : मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह शुभमन गिलसाठी मोठ डोकेदुखी ठरू शकतो. गिलनं बुमराहविरुद्ध 20 चेंडूत 24 धावा केल्या आहेत. बुमराहनं त्याला एक वेळा बादही केलं आहे. गिलनं जयदेव उनाडकटविरुद्ध संथ फलंदाजी केली आहे. उनादकटच्या 18 चेंडूत गिलनं 17 धावा केल्या आहेत.
GT vs MI Live Score, IPL 2022 : शुभमन गिलनं मुंबईविरुद्ध आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात 23.71 सरासरीनं आणि 124.81 स्ट्राईक रेटनं 166 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गिलनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 68 सामन्यात 125.15 च्या सरासरीनं 1 हजार 686 धावा केल्या आहेत. ज्यात 12 अर्धशतक आहेत. त्याची आयपीएलमधील 96 सर्वोत्तम धावसंख्या आहे.
GT vs MI Live Score, IPL 2022 :गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे.
पार्श्वभूमी
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2022 Live Score: आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे (Gujrat Titans vs Mumbai Indians) आव्हान असणार आहे. मुंबई गुणतालिकेत सर्वात खाली असून त्यांनी 9 पैकी तब्बल 8 सामने गमावले आहेत. तर गुजरातने मात्र 10 पैकी 8 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. गुजरात संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असली तरी मागील सामन्यात पंजाबने त्यांना मात दिली. दुसरीकडे मुंबईने सलग 8 सामने गमावल्यानंतर मागील सामन्यात दमदार राजस्थान संघाला मात दिली. त्यामुळे गुजरातला आज मुंबईचं आव्हान अवघड पडू शकतं.
सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरात संघाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी कामगिरी केली आहे. गुजरातने विजय मिळवलेल्या प्रत्येक सामन्याचा हिरो वेगळा आहे. कुणा एका खेळाडूच्या बळावर गुजरातचा संघ नाही. हीच गुजरातची जमेची बाजू आहे. गुजरातच्या संघाचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झालाय. तर दुसरीकडे प्लॉऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलेला मुंबईचा संघ आत्मसन्मानासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म मुंबईसाठी चिंतेची बाजू आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सातत्याने धावा जमवल्या आहेत. पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे मुंबईला पराभवाला सामोरं जावे लागलेय. गोलंदाजीतही सातत्य दिसत नाही. बुमहाराचा माराही यंदा फिका दिसत आहे. मुंबईचा संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानावर उतरेल.
मुंबईविरुद्ध शुभमन गिलची कामगिरी
शुभमन गिलनं मुंबईविरुद्ध आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात 23.71 सरासरीनं आणि 124.81 स्ट्राईक रेटनं 166 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गिलनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 68 सामन्यात 125.15 च्या सरासरीनं 1 हजार 686 धावा केल्या आहेत. ज्यात 12 अर्धशतक आहेत. त्याची आयपीएलमधील 96 सर्वोत्तम धावसंख्या आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -