(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs MI, IPL 2022 : गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर
GT vs MI Live Score, IPL 2022 : टेबल टॉपर गुजरात टायटन्सचा सामना तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे.
LIVE
Background
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2022 Live Score: आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे (Gujrat Titans vs Mumbai Indians) आव्हान असणार आहे. मुंबई गुणतालिकेत सर्वात खाली असून त्यांनी 9 पैकी तब्बल 8 सामने गमावले आहेत. तर गुजरातने मात्र 10 पैकी 8 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. गुजरात संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असली तरी मागील सामन्यात पंजाबने त्यांना मात दिली. दुसरीकडे मुंबईने सलग 8 सामने गमावल्यानंतर मागील सामन्यात दमदार राजस्थान संघाला मात दिली. त्यामुळे गुजरातला आज मुंबईचं आव्हान अवघड पडू शकतं.
सांघिक कामगिरीच्या जोरावर गुजरात संघाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी कामगिरी केली आहे. गुजरातने विजय मिळवलेल्या प्रत्येक सामन्याचा हिरो वेगळा आहे. कुणा एका खेळाडूच्या बळावर गुजरातचा संघ नाही. हीच गुजरातची जमेची बाजू आहे. गुजरातच्या संघाचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झालाय. तर दुसरीकडे प्लॉऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलेला मुंबईचा संघ आत्मसन्मानासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म मुंबईसाठी चिंतेची बाजू आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सातत्याने धावा जमवल्या आहेत. पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे मुंबईला पराभवाला सामोरं जावे लागलेय. गोलंदाजीतही सातत्य दिसत नाही. बुमहाराचा माराही यंदा फिका दिसत आहे. मुंबईचा संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानावर उतरेल.
मुंबईविरुद्ध शुभमन गिलची कामगिरी
शुभमन गिलनं मुंबईविरुद्ध आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात 23.71 सरासरीनं आणि 124.81 स्ट्राईक रेटनं 166 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गिलनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 68 सामन्यात 125.15 च्या सरासरीनं 1 हजार 686 धावा केल्या आहेत. ज्यात 12 अर्धशतक आहेत. त्याची आयपीएलमधील 96 सर्वोत्तम धावसंख्या आहे.