IPL 2022, GT vs LSG Match Highlights : राहुल तेवातिया-डेविड मिलरची विस्फोटक खेळी, गुजरातचा पाच गड्यांनी विजय
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरात आणि लखनौ या आयपीएलमधील दोन नव्या संघामध्ये आज लढत होणार आहे. हार्दिक पांड्याकडे गुजरातचं तर के.एल राहुलकडे लखनौ संघाची जबाबदारी सांभाळत आहेत.
LIVE
Background
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : आयपीएलच्या 15 हंगामात 8 जागी 10 संघ सामिल झाले आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघाच्या एन्ट्रीमुळे आता स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. दरम्यान या नव्याने सामिल झालेल्या दोन्ही संघामध्ये आज लढत असणार असून पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आयपीएलच्या मैदानात उतरणार आहेत. यावेळी हार्दीक पंड्या गुजरातचं तर राहुल लखनौचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
गुजरात आणि लखनौ संघाचा विचार करता या दोन्ही संघानी यंदा पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग घेतला असला तरी दोन्ही संघातील खेळाडू मात्र कमालीचे अनुभवी आहेत. लखनौचा कर्णधार राहुलला याआधी पंजाब संघाचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव देखील आहे. तर दुसरीकडे हार्दीक पहिल्यांदाच कर्णधार म्हणून आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजीमध्येही बरेच पर्याय असल्याने सामना चुरशीचा होणार हे नक्की.
असा आहे गुजरातचा संघ -
हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी), वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये
कसा आहे लखनौ संघ ? -
केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मनन खान, आयुष बधोनी, काइल मायर्स, कर्ण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव आणि बी साई सुदर्शन.
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातच्या समर्थकांचं आणि खेळाडूंचं सेलिब्रेशन
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातच्या समर्थकांचं आणि खेळाडूंचं सेलिब्रेशन
What a game. Went down to the wire and it is the @gujarat_titans who emerge victorious in their debut game at the #TATAIPL 2022.#GTvLSG pic.twitter.com/BQxkMXc9QL
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2022
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल तेवातिया-डेविड मिलरची विस्फोटक खेळी, गुजरातचा पाच गड्यांनी विजय
IPL 2022, GT vs LSG : राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर गुजरातने पाच गड्यांनी लखनौवर विजय मिळवला. राहुल तेवातियाने 24 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान राहुलने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. हार्दिक पांड्या, मॅथ्यू वेड आणि डेविड मिलर यांच्या छोटेखानी खेळीला राहुल तेवातियाच्या विस्फोटक खेळीची जोड मिळाली. त्याबळावर गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. लखनौ संघाची सुरुवात निराशाजनक झाली आहे.
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : गुजरातला पाचवा धक्का, डेविड मिलर बाद
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : मोक्याच्या क्षणी आवेश खान याने मिलरला बाद करत लखनौला सामन्यात जिवंत ठेवलं आहे. मिलर 23 धावा काढून बाद झाला. गुजरात टायटन्सला 15 चेंडूत 8.4 rpo प्रति ओवर सरासरी ने 21 धावांची गरज
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल-मिलरची फटकेबाजी, लखनौच्या अडचणी वाढल्या
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : राहुल-मिलरने तुफान फटकेबाजी सुरु केली आहे. त्यामुळे लखनौच्या अडचणी वाढल्या आहेत. गुजरातला विजयासाठी 22 चेंडूत 39 धावांची गरज
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : सामना रोमांचक स्थितीत
IPL 2022, GT vs LSG Match Live Update : सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. गुजरात टायटन्स ला 30 चेंडूत 13.6 rpo प्रति ओवर सरासरी ने 68 धावांची गरज आहे. गुजरातने 15 षटकानंतर 4 बाद 91 धावा केल्या आहेत.