IPL 2022 : षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या बटलरने यंदाच्या हंगामात खेळलेत सर्वाधिक डॉट बॉल
IPL 2022 : गुजरात टायन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये फायनलची लढत सुरु आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Jos Buttler Gujarat Titans vs Rajasthan Royals, Final IPL 2022 : गुजरात टायन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये फायनलची लढत सुरु आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने 39 धावांची खेळी केली, पण या छोट्या खेळीतही त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जोसने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलाय. जोस बटलरने यंदाच्या हंगामात अनेक विक्रमांना गवसणी घातले आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे. जोस बटलरने यंदाच्या हंगामात 17 सामन्यात 45 षटकार लगावलेत. पण जोस बटलरच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम नावावर झालाय. बटलरने यंदाच्या हंगामात सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळले आहेत.
होय... यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या जोस बटलरने सर्वात जास्त निर्धाव चेंडू खेळले आहे. फायनलच्या सामन्याआधी जोस बटलरने तब्बल 217 निर्धाव चेंडू खेळले आहेत. जोस बटलरने यंदाच्या हंगामात विस्फोटक फलंदाजी केली आहे. बटलरने 17 सामन्यात 863 धावांचा पाऊस पाडलाय. यादरम्यान बटलरने चार शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. 83 चौकार आणि 45 षटकार लगावलेत. जोसने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरला मागे टाकलं आहे. जोसने 39 धावांसह 863 रन पूर्ण केले आहेत. त्याने 2016 साली 848 धावा केलेल्या वॉर्नरला मागे टाकलं आहे.
यंदाच्या हंगामात बटलरने अगदी तुफान फटकेबाजी करत आयपीएल 2022 मध्ये 17 सामन्यात 57.53 च्या सरासरीने 149.05 च्या स्ट्राईक रेटने 863 रन केले आहेत. आजच्या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 824 रन होते त्यामुळे केवळ 25 रन करुन तो वॉर्नरचा 848 धावांचा रेकॉर्ड तोडू शकत होता. पण त्याने 39 धावा केल्यामुळे 863 रन नावे केल्यामुळे तो यादीत वॉर्नरच्या पुढे गेला आहे. वॉर्नरने आयपीएल 2016 मध्ये 848 रन केले होते. तर त्याच वर्षी विराट कोहलीने (Virat Kohli) 973 रन केले होते. दरम्यान विराटला मात्र बटलरला मागे टाकता आलेलं नाही.
एका आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली- 973
- जोस बटलर- 863
- डेव्हिड वॉर्नर- 848