DC vs SRH, Match Live Updates : दिल्लीचा हैदराबादवर विजय, खलीलचा भेदक मारा

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.

abp majha web team Last Updated: 05 May 2022 11:33 PM
दिल्लीचा हैदराबादवर विजय, खलीलचा भेदक मारा

खलील अहमदच्या भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. 

हैदराबादला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी पूरन बाद

शार्दूल ठाकूरने मोक्याच्या क्षणी निकोलस पूरनला बाद करत सामना दिल्लीच्या बाजूने फिरवला. पूरन 62 धावांवर बाद झाला. हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 43 धावांची गरज आहे. 

खलीलचा भेदक मारा..

यंदाच्या हंगामात खलील अहमदने भेदक मारा केला. खलील अहमद याने हैदराबादविरोधा चार षटकात 30 धावा खर्च करत तीन गड्यांना तंबूत धाडले. खलीलने सात सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. खलील अहमदची यंदाची कामगिरी...


4-0-27-2
4-0-34-2
4-0-25-3
4-0-36-1
4-0-21-2
4-0-47-1
4-0-30-3

सीन एबॉट बाद, हैदराबादला सहावा धक्का

खलील अहमदने सीन एबॉटला बाद करत दिल्लीला सहावे यश मिळवून दिले. एबॉट आठ धावा काढून बाद झाला. हैदराबादला विजयासाठी 20 चेंडूत 54 धावांची गरज.. निकोलस पूरन 50 धावांवर खेळत आहे. 

निकोलस पूरनची विस्फोटक खेळी, सामना रोमांचक स्थितीत

निकोलस पूरन याने विस्फोटक खेळी करत सामन्यात रंगत आणली आहे. निकोलस पूरन याने मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावलेय. पूरन याने 29 चेंडूत अर्धशतक झळकावलेय. 

हैदराबदचा अर्धा संघ तंबूत

शशांक सिंहच्या रुपाने हैदराबादला पाचवा धक्का बसला. शशांक 10 धावा काडून बाद झाला

दिल्लीला चौथं यश, धोकादायक मार्करमला खलीलने केले बाद

खलील अहमद याने धोकादायक एडन मार्करमला 42 धावांवर बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला. हैदराबादला विजयासाठी 42 चेंडूत 107 धावांची गरज

सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 118 धावांची गरज

सनरायजर्स हैदराबादला 48 चेंडूत 14.75 प्रति ओवर सरासरीने 118 धावांची गरज

DC vs SRH : हैदराबादला तिसरा धक्टका, राहुल त्रिपाठी बाद

DC vs SRH :  राहुल त्रिपाठीच्या रुपाने हैदराबादला तिसरा धक्का बसला आहे. त्रिपाठी 22 धावांवर बाद झाला... 

DC vs SRH : हैदराबादला मोठा झटका, कर्णधार बाद

केन विल्यमसन आजही खास कामगिरी करु शकला नाही. नॉर्खियाने त्याला 24 धावांवर तंबूत धाडलं आहे.

DC vs SRH : अभिषेक आज फ्लॉप

मागील काही सामने दमदार कामगिरी करणारा अभिषेक शर्मा आज केवळ 7 धावा करुन बाद झाला आहे. खलीलने त्याला तंबूत धाडलं आहे.

DC vs SRH : दिल्लीचा स्कोर 200 पार

वॉर्नर आणि पोवेच्या तुफान फटकेबाजीमुळे दिल्लीने 207 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 208 धावा करायच्या आहेत.

DC vs SRH : पॉवेलचं दमदार अर्धशतक

दिल्लीकडून रोवमेन पोवेलने दमदार अर्धशतक झळकावलं आहे.

DC vs SRH : डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक पूर्ण

दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं आजही दमदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं आहे. 34 चेंडूत त्यानं अर्धशतक झळकावलं आहे.

DC vs SRH, Match Live Updates : दिल्लीला मोठा धक्का, कर्णधार पंत बाद

DC vs SRH : ऋषभ पंतच्या रुपाने दिल्लीला तिसरा धक्का बसला. कर्णधार पंत 26 धावा काढून माघारी परतला.. दिल्ली 9.4 षटकात तीन बाद 90 धावा

DC vs SRH : मिचेल मार्श बाद

मिचेल मार्श 10 धावा करुन तंबूत परतला आहे. सीन एबॉटने त्याला बाद केलं आहे.

DC vs SRH : दिल्लीला शून्य धावांवर पहिला झटका

मनदीप सिंह शून्य धावा करुन बाद झाला आहे. भुवनेश्वरने त्याला बाद केलं आहे.

DC vs SRH : हैदराबाद अंतिम 11  

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, सिन एबॉट, उम्रान मलिक. 

DC vs SRH : दिल्ली अंतिम 11

ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर,  मनदीप सिंह, मिचेल मार्श,  ललित यादव, रोवमन पोवेल, रिपल पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया


 

DC vs SRH : दोन्ही संघा मोठे बदल

दोन्ही संघानी काही बदल केले आहेत. यात दिल्लीने चार तर हैदराबादने तीन बदल करत संघ उतरवला आहे. यावेळी दिल्लीमध्ये पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, मुस्तफिजूर रेहमान आणि चेतन साकरिया यांना विश्रांती दिली असून एनरिक नॉर्खिया, मनदीप सिंह, रिपल पटेल आणि खलील अहमद यांना संधी दिली आहे. दुसरीकडे हैदराबादमध्ये कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि सिन एबॉट यांना संधी देण्यात आली आहे. 

DC vs SRH : सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दोन्ही संघानी आज काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

DC vs SRH : आजवर दिल्ली विरुद्ध हैदराबाद

आयपीएलमध्ये आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs sunrisers hyderabad) हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं (SRH) पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने (DC) 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.

DC vs SRH : आज दिल्ली -हैदराबाद आमने-सामने

आज मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (DC vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार येणार आहेत.

पार्श्वभूमी

DC vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनराजयजर्स हैदराबाद (DC vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेचा विचार करता हैदराबादने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकत पाचवं स्थान मिळवलं आहे. तर दिल्लीचा संघ मात्र 9 पैकी 4 सामनेच जिंकला असल्याने सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दोघांचीही पुढील फेरीत पोहचण्याची शक्यता समसमान असल्याने आजचा सामना जिंकणं दोघांसाठी अत्यंत महत्वाचं असेल. त्यात आजवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs sunrisers hyderabad) हे संघ तब्बल 20 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं (SRH) पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने (DC) 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. 


आजचा सामना आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. त्यात सामना संध्याकाळी असल्याने दव पडण्याची शक्यता अधिक आहे. दव पडल्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे आजच्या सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच आधी गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. पण नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. 


दिल्ली अंतिम 11


ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर,  मनदीप सिंह, मिचेल मार्श,  ललित यादव, रोवमन पोवेल, रिपल पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया


हैदराबाद अंतिम 11  


अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, सिन एबॉट, उम्रान मलिक. 


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.