DC vs LSG, Match Highlights : अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या चुरशीचा सामन्यात दिल्ली पराभूत; लखनौचा सातवा विजय
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या लखनौ संघाची लढत दिल्ली कॅपिटल्सशी असणार आहे.
LIVE
Background
DC vs LSG, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 45 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स (DC vs LSG) या दोन संघात पार पडत आहे. यातील लखनौ संघाचा यंदाच्या हंगामातील (IPL 2022) फॉर्म दमदार असल्याने त्यांच्यासाठी आजचा सामना पुढील फेरीत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. तर दिल्लीसाठी हा हंगाम खडतर असल्याने त्यांना स्पर्धेत टिकून राहण्याकरता आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणतालिकेचा विचार करता लखनौ तिसऱ्या स्थानी असून त्यांनी 9 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली 8 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
आजचा सामना होणाऱ्या मुंबईतील वानखेडे मैदानातील सीमारेषा पाहता मोठा स्कोर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यात मागील काही सामन्यांपासून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. पण आजचा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण होऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी देखील घेऊ शकतो. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
दिल्ली अंतिम 11
पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया
लखनौ अंतिम 11
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कुणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, कृष्णपा गौथम, रवी बिश्नोई
हे देखील वाचा-
DC vs LSG : दिल्ली पराभूत, लखनौची गुणतालिकेत झेप
दिल्ली संघाने अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली पण अखेर 6 धावांनी त्यांचा पराभव झाला असून लखनौने सामना जिंकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
DC vs LSG : दिल्लीला 6 चेंडूत 21 धावांची गरज
अखेरचं षटक सुरु असून दिल्लीला 6 चेंडूत 21 धावांची गरज आहे. क्रिजवर कुलदीप आणि अक्षर आहेत.
DC vs LSG : शार्दूलही बाद
संघाला अत्यंत गरज असताना शार्दूल ठाकूर केवळ एक धाव करुन बाद झाला आहे. कृणालने त्याला बाद केलं आहे.
DC vs LSG : रोवमेन पोवेल बाद
दिल्लीला मोठा झटका बसला आहे. रोवमेन पोवेल 35 धावा करुन बाद झाल्यामुळे दिल्लीचा विजय अवघड होत आहे. मोहसीनने हा महत्त्वाचा विकेट घेतला आहे.
DC vs LSG : कर्णधार पंत बाद
दिल्लीला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेला ऋषभ पंत अखेर बाद झाला आहे. त्याने 44 धावा केल्या असून अजूनही 38 चेंडूत 74 धावांची गरज दिल्लीला आहे.