IPL 2022: कोलकाता नाईट राडयर्स आणि राजस्थान रॉयल्स (Kolkata Knights Riders Vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलच्या पधराव्या हंगामातील 47 वा सामना खेळण्यात आला. हा सामना कोलकात्यानं सात विकेट्सनं विजय मिळवला. दरम्यान, कोलकात्याच्या डावातील 19 व्या षटकात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं पंचाशी हुज्जत घालताना दिसला. प्रसिद्ध कृष्णानं टाकलेला चेंडू वाईड नसतानाही पंचानी वाईडचा इशारा केला. त्यानंतर लगेच संजू सॅमसननं डीआरएचची मागणी केली. ज्यामुळं क्रिडाविश्वाच नव्या चर्चाला सुरुवात झाली. यावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी (Daniel Vettori) आणि दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाज इम्रान ताहिरनं (Imran Tahir) मोठी प्रतिक्रिया दिली. 


नेमकं काय घडलं?
कोलकात्याच्या डावातील 18 व्या षटकात राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात केकेआरचे नितीष राणा आणि रिंकू सिंह हे दोन्ही डावखुरे फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन फलंदाजी करत होते. त्यामुळे प्रसिध उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करत होता आणि मैदानातील पंच ते चेंडू वाईड ठरवत होते. दरम्यान, या षटकात पंचांनी पहिल्यांदा वाईड दिल्यानंतर संजू सॅमसन शांत होता. परंतु, पण जेव्हा फलंदाज वाईडच्या रेषेबाहेर जाऊन फलंदाजी करत होता आणि पंचानी पुन्हा वाईड दिला तेव्हा संजू चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


डॅनियल व्हिटोरी काय म्हणाला?
सामन्यादरम्यान पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं  संघाला अनेकदा मोठा फटका बसल्याचं आपण पाहिलं आहे. अशा चुकांना टाळण्यासाठी डीआरएसचा नियम बनवण्यात आला. आयसीसी  22.4.1 नियमानुसार, ज्या चेंडूवर फलंदाज शॉट मारू शकतो, त्याला पंच वाईट ठरवू शकत नाही. जर फलंदाज हालचाल करतोय आणि वाईट रेषेबाहेर जावून चेंडू खेळतोय. तसेच त्यावेळी फलंदाजाच बॅटनं चेंड मारू शकतो तर, त्याला वाईड घोषित केलं जात नाही. यामुळं वाईड बॉल आणि हाईट नो-बॉलसाठी डीआरएसचा पर्याय मिळायला हवा."


इमरान ताहिर म्हणतोय...
क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या हितासाठी नियम फार कमी आहेत. जेव्हा फलंदाज तुम्हाला सर्व मार्गाने फटके मारत असतात, तेव्हा तुमच्याकडे वाइड यॉर्कर टाकणे किंवा वाइड लेग ब्रेक टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. जर हा चेंडू वाईड गेला तर तुम्ही अतिरिक्त धावा देता. जे तुमच्या संघासाठी घातक ठरू शकतं. कोलकाता आणि राजस्थान यांच्यात पंचांनी दिलेल्या वाईड खूप जवळचा होता. ज्यामुळं सॅमसन निराश झाला. मला वाटत नाही की हा फार मोठा मुद्दा असावा.या सामन्यात कोलकात्याचा संघ ज्या प्रकारे खेळत होता, ते पाहून ते जिंकणारच होते. परंतु, वाईड बॉलबाबत डीआरएस घेण्याच्या पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे."


हे देखील वाचा-