IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाताच्या (Kolkata knights Riders) संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. यंदाच्या हंगामात कोलकात्यानं आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, चार सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. यातच कोलकाताच्या चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या मेगाऑक्शनपूर्वी कोलकात्याच्या संघानं ज्या खेळाडूंना रिटेनं केलं, आता त्यांनाचा संघाबाहेर केलं आहे. ज्यामुळं कोलकाता संघाच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न चाहत्यांसह अनेकांना पडत आहे. 


कोलकाताच्या खराब कामगिरीत संघानं रिटेन केलेल्या खेळाडूंची महत्वाची भूमिका आहे. आयपीएल 2022 च्या मेगाऑक्शनपूर्वी कोलकात्यानं अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल, सुनील नारायण, वरूण चक्रवर्ती आणि व्यंटकेश अय्यरला रिटेनं केलं होतं. परंतु, या चार खेळाडूंपैकी फक्त आंद्रे रसेल हा संघाच्या विश्वासावर काही प्रमाणात खरा उतरू शकला आहे. मिस्टी स्पिनर वरूण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यरला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यात आलं आहे. या दोघांना कोलकात्याच्या संघानं 8-8 कोटीत रिटेन केलं होतं. 


वरूण चक्रवर्तीचं खराब प्रदर्शन
दरम्यान, खराब कामगिरीमुळं कोलकात्याच्या संघानं वरूण चक्रवर्तीला संघाबाहेर केलं आहे. राजस्थानविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. वरूण चक्रवर्तीनं यंदाच्या हंगामात आठ सामने खेळले आहेत. ज्यात 61.75 च्या सरासरीनं फक्त चार विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याचा इकोनॉमी रेट 8.82 इतका होता. आयपीएलच्या मागच्या हंगामात वरूण चक्रवर्तीनं दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. टी-20 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता. परंतु, यंदाच्या हंगामात वरूण चक्रवर्ती संघाबाहेर होणार आहे. 


व्यंकटेश अय्यरचा फॉप फॉर्म
कोलकात्याच्या संघाला व्यंकटेश अय्यरकडून मोठी अपेक्षा होती. परंतु, त्याला काही खास कमगिरी करता आली नाही. राजस्थानविरुद्ध सामन्यात तोही संघाबाहेर होता. यंदाच्या हंगामात व्यंटकेश अय्यरनं नऊ सामन्यात 16.50 च्या सरासरीनं केवळ 132 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्यानं उत्कष्ट कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर कोलकात्याच्या संघानं त्याला रिटेनं करण्याचा निर्णय घेतला. 



हे देखील वाचा-