Mohammed Shami Case :  क्रिकेटपटू मोहम्मद शमीला (Mohammed Shami) कोलकाता उच्च न्यायालयाने (Court)  मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांना दरमहा 4 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. मोहम्मद शमीला मासिक देखभालीसाठी हे पैसे द्यावे लागतील. शमीच्या या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिल 2025 रोजी झाली होती. त्यानंतर आज 1 जुलै 2025 रोजी न्यायालयानं हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

मोहम्मद शमीला दरमहा 4 रुपये द्यावे लागणार

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला दरमहा 1 लाख 50 हजार रुपये राहण्यासाठी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच, शमी आणि हसीन जहाँची मुलगी आयरा यांचा मासिक खर्च देण्याचा आदेश देण्यात आला आहे. आयराला दरमहा 2 लाख 50 हजार रुपये पाठवावे लागतील.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील हा खटला सात वर्षे जुना आहे. त्यामुळे शमीला गेल्या सात वर्षांपासूनच्या खर्चाप्रमाणे रक्कम द्यावी लागेल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मोहम्मद शमीला गेल्या सात वर्षांचा खर्चही भरावा लागेल. शमीला त्याच्या पत्नी आणि मुलीला सात वर्षांसाठी 4 लाख रुपये दरमहा या दराने 3 कोटी 36 लाख रुपये द्यावे लागतील.

नेमकं काय आहे प्रकरण?

कलकत्ता उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला पुढील सहा महिन्यांत हा खटला निकाली काढण्याचे आदेशही दिले आहेत. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे लग्न 7 एप्रिल 2014 रोजी झाले होते. लग्नानंतर सुमारे एक वर्षानंतर, 17 जुलै 2015 रोजी त्यांना एका मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी आयरा ठेवले. मुलगी आयराच्या जन्मानंतर, शमीला कळले की हसीन जहाँ आधीच विवाहित आहे आणि तिला तिच्या पहिल्या लग्नापासून दोन मुले देखील आहेत. त्यानंतर हसीन जहाँने मोहम्मद शमीसह त्याच्या कुटुंबावर हिंसाचाराचा आरोप केला. त्यानंतर, 2018 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अनेक वेळा निकाल आला आहे, ज्यामध्ये शमीने त्याच्या पत्नी आणि मुलीचा खर्च भरावा असा निर्णय घेण्यात आला आहे. पण प्रत्येक वेळी हसीन जहाँला रक्कम कमी आढळली आणि तिने खर्चासाठी जास्त पैसे मागितले. आता कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला दरमहा 4 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

VIDEO : मोहम्मद शमीच्या घटस्फोटीत पत्नीचा बेडरुममधील 'तो' भन्नाट डान्स पुन्हा व्हायरल, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं