Bobby Darling One Night Stand With Top Cricketer: बॉबी डार्लिंगनं (Bobby Darling) अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमधून (Blockbu आपल्या अभिनयाची जादू दाखवली. अल्पावधीतच बॉबी डार्लिंगनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. ट्रान्स अभिनेत्री असलेल्या बॉबी डार्लिंगनं नुकताच एक खुलासा केला आहे. ज्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमिन हादरली आहे. तसेच, बॉबी डार्लिंगच्या वक्तव्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना बॉबी डार्लिंगनं वन नाईट स्टँडबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. बॉबी डार्लिंगनं असा दावा केला आहे की, तिनं एका माजी क्रिकेटपटूसोबत वन नाईट स्टँड केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना बॉबी डार्लिंगनं हा खुलासा केला. तसेच, याच मुलाखतीत बोलताना बॉबी डार्लिंगनं क्रिकेटरचं नावंही घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर बॉबी डार्लिंगची मुलाखत व्हायरल होत आहे. दरम्यान, बॉबी डार्लिंगनं Bollywood Thikana ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माजी क्रिकेटरबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
बॉबी डार्लिंग कुणाचं नाव घेतलं?
बॉबी डार्लिंगनं ज्या भारतीय क्रिकेटपटूचं नाव घेतलं, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू मुनाफ पटेल (Munaf Patel). बॉबी डार्लिंग मुलाखतीत बोलताना म्हणाली की, त्यावेळी आमच्यात मैत्री होती आणि एका क्लबमध्ये भेटायचो. आम्ही क्लबमध्ये गेलो आणि एकत्र पार्टी केली. त्या काळात अनेकदा लोकांनी आम्हाला एकत्र पाहिलंय आणि कोणीतरी सांगितलं की, मी मुनाफ पटेलसोबत पार्टी केली आणि मी त्याला भेटले.
त्यावेळी लोकांनी कदाचित त्याचा चुकीचा अर्थ लावला असेल. बॉबी डार्लिंग पुढे बोलताना म्हणाली की, "त्या काळात माझी इमेज फ्लर्टीशियस होती. ती म्हणाली की, मी कधीही असं म्हणणार नाही की, आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, पण थोडीशी अटॅचमेंट होती. असंही जेव्हा लोक एकमेकांना भेटतात, तेव्हा सर्वात आधी प्रेम होतं आणि नंतर प्रेम होतं.
माझी खूपच बदनामी होईल, असं त्याला वाटलं अन् आमचं नातं तुटलं
आमच्यात थोडं प्रेम होतं, पण त्याला काय बोलू सकतो? कदाचित 'वन नाईट स्टँड'. दरम्यान, बॉबी डार्लिंगच्या या मुलाखतीवर क्रिकेटर मुनाफ पटेलनं कोणतीही रिअॅक्शन दिलेली नाही. बॉबी डार्लिंगनं म्हटलंय की, मी याबाबत मीडियामध्ये सांगितलं होतं. म्हणूनच नातं तुटलं. मुनाफ पटेलनं बॉबी डार्लिंगला म्हटलं की, माझी खूपच बदनामी होईल, सगळे क्रिकेटर्स मला काय बोलतील? मुनाफ असं म्हणाल्यामुळेच त्यांचं नातं तुटलं, असा दावाही बॉबी डार्लिंगनं केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :