IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने- सामने आले. या सामन्यात कोलकात्याच्या संघानं सात विकेट्स राखून राजस्थानचा पराभव केला. मागील पाच सामन्यात कोलकात्याच्या संघाला सलग पाच सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. आयपीएलच्या गुणतालिकेत 8 गुणांसह कोलकात्याचा संघ सातव्या स्थानावर आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन पंचावर भडकल्याची घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
कोलकात्याच्या डावातील 18 व्या षटकात राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात केकेआरचे नितीष राणा आणि रिंकू सिंह हे दोन्ही डावखुरे फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन फलंदाजी करत होते. त्यामुळे प्रसिध उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करत होता आणि मैदानातील पंच ते चेंडू वाईड ठरवत होते. दरम्यान, या षटकात पंचांनी पहिल्यांदा वाईड दिल्यानंतर संजू सॅमसन शांत होता. परंतु, पण जेव्हा फलंदाज वाईडच्या रेषेबाहेर जाऊन फलंदाजी करत होता आणि पंचानी पुन्हा वाईड दिला तेव्हा संजू चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ-
कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या होत्या. नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी करत कोलकात्याला सामना जिंकून दिलाय. राजस्थानला पराभूत करून कोलकात्याच्या संघानं या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह कोलकात्याच्या संघाचं आठ गुण झाले आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आयपीएल 2022 चे 47 सामने आटोपले; 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, वाचा संपूर्ण संघाचं गणित?
- GT vs PBKS, Pitch Report : आज गुजरात विरुद्ध पंजाबमध्ये सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
- KKR Vs RR: कोलकात्यानं सामना जिंकला, राजस्थानचा सात विकेट्सनं पराभव, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे