IPL 2022: आयपीएलच्या मागच्या चौदाव्या हंगामात कोलकाता नाईट राडयर्सचा (Kolkata Knights Riders) संघ उपविजेता ठरला होता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली मागच्या हंगमात कोलकात्याच्या संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यानंतर सलग सामने जिंकून कोलकात्याच्या संघानं प्लेऑफमध्ये स्थान पटकावले. एवढेच नव्हेतर, प्लेऑफमधील सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यर कोलकात्याच्या संघाची धुरा संभाळत आहे. कोलकात्यानं आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात कोलकात्याला पराभव स्वीकारावा लागला. परंतु एक चूक संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकून देऊ शकते.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकात्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती. दरम्यान, कोलकात्यानं पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर कोलकात्याच्या संघानं सलग पाच सामने गमावले. कोलकात्याचे फक्त चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चारपैकी एकाही सामन्यात कोलकात्याचा संघ पराभूत झाल्यास तर, त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं कठीण होईल.


गुणतालिकेत कोलकात्याचा संघ कितव्या क्रमांकावर
दरम्यान, आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत कोलकात्याचा संघ 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. महत्वाचं म्हणजे, कोलकात्याचं रन रेटही चांगला नाही. यामुळं संघाला केवळ सामने जिंकायचे नाहीत तर, चांगल्या रन रेटनं विजय मिळवण गजजेचं आहे. यामुळं कोलकात्याचा संघ त्यांच्या पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो? हे येत्या काळात स्पष्ट होईल.


कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या होत्या. नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी करत कोलकात्याला सामना जिंकून दिलाय. राजस्थानला पराभूत करून कोलकात्याच्या संघानं या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह कोलकात्याच्या संघाचं आठ गुण झाले आहेत. 


हे देखील वाचा-