एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

DRS: 'या' दोन बॉलसाठीही हवाय डीआरएसचा पर्याय, डॅनियल व्हिटोरी आणि इम्रान ताहिर यांची महत्वाची मागणी

IPL 2022: कोलकाता नाईट राडयर्स आणि राजस्थान रॉयल्स (Kolkata Knights Riders Vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलच्या पधराव्या हंगामातील 47 वा सामना खेळण्यात आला.

IPL 2022: कोलकाता नाईट राडयर्स आणि राजस्थान रॉयल्स (Kolkata Knights Riders Vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएलच्या पधराव्या हंगामातील 47 वा सामना खेळण्यात आला. हा सामना कोलकात्यानं सात विकेट्सनं विजय मिळवला. दरम्यान, कोलकात्याच्या डावातील 19 व्या षटकात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं पंचाशी हुज्जत घालताना दिसला. प्रसिद्ध कृष्णानं टाकलेला चेंडू वाईड नसतानाही पंचानी वाईडचा इशारा केला. त्यानंतर लगेच संजू सॅमसननं डीआरएचची मागणी केली. ज्यामुळं क्रिडाविश्वाच नव्या चर्चाला सुरुवात झाली. यावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी (Daniel Vettori) आणि दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाज इम्रान ताहिरनं (Imran Tahir) मोठी प्रतिक्रिया दिली. 

नेमकं काय घडलं?
कोलकात्याच्या डावातील 18 व्या षटकात राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात केकेआरचे नितीष राणा आणि रिंकू सिंह हे दोन्ही डावखुरे फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन फलंदाजी करत होते. त्यामुळे प्रसिध उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करत होता आणि मैदानातील पंच ते चेंडू वाईड ठरवत होते. दरम्यान, या षटकात पंचांनी पहिल्यांदा वाईड दिल्यानंतर संजू सॅमसन शांत होता. परंतु, पण जेव्हा फलंदाज वाईडच्या रेषेबाहेर जाऊन फलंदाजी करत होता आणि पंचानी पुन्हा वाईड दिला तेव्हा संजू चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 

डॅनियल व्हिटोरी काय म्हणाला?
सामन्यादरम्यान पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळं  संघाला अनेकदा मोठा फटका बसल्याचं आपण पाहिलं आहे. अशा चुकांना टाळण्यासाठी डीआरएसचा नियम बनवण्यात आला. आयसीसी  22.4.1 नियमानुसार, ज्या चेंडूवर फलंदाज शॉट मारू शकतो, त्याला पंच वाईट ठरवू शकत नाही. जर फलंदाज हालचाल करतोय आणि वाईट रेषेबाहेर जावून चेंडू खेळतोय. तसेच त्यावेळी फलंदाजाच बॅटनं चेंड मारू शकतो तर, त्याला वाईड घोषित केलं जात नाही. यामुळं वाईड बॉल आणि हाईट नो-बॉलसाठी डीआरएसचा पर्याय मिळायला हवा."

इमरान ताहिर म्हणतोय...
क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या हितासाठी नियम फार कमी आहेत. जेव्हा फलंदाज तुम्हाला सर्व मार्गाने फटके मारत असतात, तेव्हा तुमच्याकडे वाइड यॉर्कर टाकणे किंवा वाइड लेग ब्रेक टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. जर हा चेंडू वाईड गेला तर तुम्ही अतिरिक्त धावा देता. जे तुमच्या संघासाठी घातक ठरू शकतं. कोलकाता आणि राजस्थान यांच्यात पंचांनी दिलेल्या वाईड खूप जवळचा होता. ज्यामुळं सॅमसन निराश झाला. मला वाटत नाही की हा फार मोठा मुद्दा असावा.या सामन्यात कोलकात्याचा संघ ज्या प्रकारे खेळत होता, ते पाहून ते जिंकणारच होते. परंतु, वाईड बॉलबाबत डीआरएस घेण्याच्या पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे."

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Embed widget