RCB vs CSK, Match Highlights : बंगळुरुचा चेन्नईवर विजय; 13 धावांनी दिली मात
आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 49 वा सामना चेन्नई आणि बंगळुरु या संघामध्ये एमसीए मैदानात पार पडणार आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 May 2022 10:58 PM
पार्श्वभूमी
RCB vs CSK, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 49 वा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिेग्स (RCB vs CSK)असा पार पडणार आहे. दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंची फौज असल्याने...More
RCB vs CSK, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 49 वा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिेग्स (RCB vs CSK)असा पार पडणार आहे. दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंची फौज असल्याने आजचा सामना क्रिकेटरसिकांसाठी एक पर्वणी असेल. गुणतालिकेचा विचार करता बंगळुरुचा संघ 10 पैकी पाच सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचव्या स्थानावर आहे. तर चेन्नईचा संघ मात्र संघ 9 पैकी 6 सामने गमावल्याने सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. बंगळुरुचा फॉर्म चांगला असला तरी चेन्नई देखील पुन्हा फॉर्ममध्ये परतली असून धोनी पुन्हा कर्णधार झाल्याने आजचा सामनाही रंगतदार होऊ शकतो.आजचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर (MCA Ground, Pune) आतापर्यंतच्या काही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघही विजयी झाला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना दवाची अडचण अधिक येत नसल्याने गोलंदाजी चोख पडते. यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेण्याची अधिक शक्यता आहे. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. बंगळुरु संभाव्य अंतिम 11विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड.चेन्नई संभाव्य अंतिम 11 ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो/मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, महेश थेक्षाना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.हे देखील वाचा-Virat Kohli New Look: क्रिकेटर आहे की हॉलिवूडचा अभिनेता? विराट कोहलीच्या नव्या लूकवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रियाRCB Vs CSK Probable XI: बंगळुरूला पुन्हा हरवण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हनIPL Purple Cap 2022: पर्पल कॅपची स्पर्धा रोमांचक स्थितीत, 'या' पाच गोलंदाजांचं एकमेकांना मोठं आव्हान
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
RCB vs CSK : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय
चेन्नईचे फलंदाज खास कामगिरी न करु शकल्याने बंगळुरुने चेन्नईवर 13 धावांनी विजय मिळवला आहे.