CSK vs PBKS, IPL 2022 Live Score: पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव
आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल.

Background
आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत.
चेन्नईकडे पहिला विजय मिळवण्याचं लक्ष्य
रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला आपली जुनी जादू कायम ठेवता आलेली नाही. चेन्नईच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईचा संघ ज्या दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो तसा गोलंदाजीत दमदारपणा अद्याप पाहायला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जडेजा आणि धोनीला पुन्हा एकदा संघाच्या रणनीतीचा विचार करावा लागणार आहे.
पंजाबसाठी 'गुड न्यूज'
या सामन्यापूर्वी पंजाबसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टो संघात सामील झाला आहे. तो चेन्नईविरुद्धही मैदानात उतरण्याची शकता आहे. पंजाबसाठी सर्वात मोठी समस्या त्यांची गोलंदाजी आहे. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि ऑफस्पिनर हरप्रीत ब्रार यांना काही विशेष साध्य करता आलेले नाही. अशा स्थितीत संघालाही त्यांचे पर्याय शोधावे लागतील.
जर आपण आयपीएल 2022 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर चेन्नई 8 व्या स्थानावर आहे. तर पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स सध्या अव्वल स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत.
पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव
पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव
सामना सीएचकेच्या हाताबाहेर, 8 विकेट पडल्या, धोनी अजूनही मैदानात
या सामन्यात चेन्नईची अत्यंत खराब कामगिरी दिसत असून आता संघाचे 8 गाडी बाद झाले आहेत.




















