IPL 2022: सुरेश रैनाचा बंगळुरूच्या संघाला पाठिंबा, काय आहे कारण?
IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीनं आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.
IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीनं आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. परंतु, विजेतेपद मिळविण्यासाठी आरसीबीच्या संघाला सलग तीन सामने जिंकावे लागतील. आरसीबीला प्रथम एलिमिनेटर सामना, नंतर क्वालिफायर सामना जिंकावा लागेल आणि त्यानंतर अंतिम सामना जिंकावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि प्रदीर्घ काळ चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या सुरेश रैनाची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं यंदा आयपीएलची ट्राफी जिंकावी, अशी इच्छा आहे. त्याचं कारणही त्यानं सांगितलं आहे.
सुरेश रैना काय म्हणाला?
आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नईच्या यशात महत्वाची भूमिका बजावणारा सुरेश रैना स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, मला खरंच असं वाटतंय की, यंदाच्या हंगामात आरसीबीच्या संघानं आयपीएलची ट्रॉफी जिंकावी. आरसीबीनं विराट कोहलीसाठी आयपीएलच्या यंदाचा हंगाम जिंकावा.
आयपीएल 2022 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल?
आयपीएल 2022 चा खिताब जिंकण्यासाठी आरसीबीला पहिल्या एलिमिनेटर सामन्यात लखनौला पराभूत करावा लागेल. त्यांनंतर क्वालीफायर 2 मध्ये क्वालीफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाची सामना जिंकावा लागेल. त्यानंतर अंतिम सामन्यातही क्वालीफायर 1 मध्ये जिंकणाऱ्या संघाविरोधात विजय मिळवावा लागेल. म्हणजेच, आरसीबीच्या संघाला सलग तीन सामने जिंकणं गरजेचं आहे. हे थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही.
आयपीएल 2022 प्लेऑफच्या सामन्यांचं वेळापत्रक-
सामना | संघ | तारीख | ठिकाण |
क्वालीफायर-1 | गुजरात टाइटंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स | 24 मे 2022 | कोलकता |
एलिमिनेटर | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बैंगलोर | 24 मे 2022 | कोलकाता |
क्वालीफायर-2 | एलिमिनेटरचा विजेता आणि पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेला संघ | 27 मे 2022 | अहमदाबाद |
फायनल | क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधील विजेता संघ | 29 मे 2022 | अहमदाबाद |
आयपीएल 2022 मध्ये आरसीबीनं 14 पैकी आठ सामने जिंकले आहेत. 16 गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. या सामन्यात जिथे विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल. तसेच पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल.
हे देखील वाचा-
- IPL 2022: आरसीबीचा संघ कोलकात्याला रवाना, एलिमिनेटर सामन्यात लखनौशी भिडणार; कसं असेल प्लेऑफचं वेळापत्रक?
- Umran Malik: 'हे सर्व त्याच्या मेहनतीमुळं घडलं' भारतीय संघात स्थान मिळवलेल्या उमरान मलिकचे वडील भावूक
- IPL 2022: आयपीएलमध्ये शिखर धवन चौकारांचा बादशाह! विराट, वार्नर, रोहितलाही गाठता नाही आला 'हा' आकडा