Harshal Patel on IPL | हर्षल पटेलच्या नावे नकोसा विक्रम, एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज
हर्षल पटेलने टाकलेली शेवटची ओव्हर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक ठरलं आहे. एका षटकात 37 रन देणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
IPL 2021 CSKvsRCB | चेन्नईच्या रविंद्र जाडेजानं तुफाट फटकेबाजी कर एका चेन्नईच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. रविंद्र जाडेजाच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर चेन्नईने बंगलोरवर 69 धावांनी मोठा विजय मिळवला. जाडेजाने 28 चेंडूत पाच षटकारांसह 62 धावांची तुफानी खेळी केली. रविंद्र जाडेजानं हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात पाच षटकार एक चौकारासह 37 धावा ठोकल्या. जाडेजाच्या या खेळीनंतर बंगलोरच्या हर्षल पटेलच्या नावे आयपीएलमध्ये नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
हर्षल पटेलने टाकलेली शेवटची ओव्हर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक ठरलं आहे. एका षटकात 37 रन देणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी कोच्ची टस्कर्सच्या परमेस्वरनच्या नावे हा विक्रम होता. बंगलोरकडून खेळताना 2011 मध्ये ख्रिस गेलने परमेस्वरनच्या एक षटकात 37 धावा कुटल्या होत्या. त्यानंतर सुरेश रैनाने 2014 मध्ये पंजाबच्या परविंदर अवानाच्या एका षटकात 32 धावा ठोकल्या होत्या.
हर्षल पटेलली ओव्हर
पहिला चेंडू- षटकार
दुसरा चेंडू - षटकार
तिसरा चेंडू- षटकार (नो बॉल)
चौथा चेंडू- षटकार
पाचवा चेंडू- दोन धावा
सहावा चेंडू- षटकार
सातवा चेंडू- चौकार
टॉप 10- आयपीएल इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा
- रविंद जाडेजा - हर्षल पटेल (37 धावा) - 2021
- ख्रिस गेल - पी. परमेश्वरन(37 धावा) 2011
- सुरेश रैना - परविंदर अवाना (32 धावा) - 2014
- विराट कोहली - शिवाल कौशिक (30 धावा) - 2016
- ख्रिस गेल - राहुल शर्मा (30 धावा) - 2012
- वीरेंद्र सेहवाग - अँड्र्यू सायमंड्स (30 धावा) 2008
- राहुल तेवतिया- शेल्डन कोटरेल (30 धावा) - 2020
- शॉन मार्श - जोहान व्हॅन डर वाथ (30 धावा) 2011
- पॅट कमिन्स - सॅम करन (30 धावा) - 2021
- हार्दिक पांड्या - अशोक डिंडा (28 धावा) - 2017
चेन्नईचा बंगलोरवर 69 धावांनी विजय
चेन्नईने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरला 20 षटकात 9 बाद 122 धावा करता आल्या. विजयासाठी दिलेल्या 192 धावांचं लक्ष्य गाठताना बंगलोरची सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली 8 धावा करत बाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 7 धावा आणि एबी डिव्हिलियर्स 4 धावांवर बाद झाला. देवदत्त पडिक्कल 15 चेंडूत 34 धावांची खेळी केली. मॅक्सवेलने 22, जेमिसननं 16 धावा केल्या. चेन्नईकडून रविंद्र जाडेजानं 3, इम्रान ताहिरनं 2 तर सॅम करन, शार्दुल ठाकूरनं एक एक विकेट घेतली.