IPL 2021 Final : आज आयपीएलचा अंतिम सामना, चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडरचा महामुकाबला
आज आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई आणि कोलकाता या संघांमध्ये होणार आहे.
CSK vs KKR Match Preview: आज आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई आणि कोलकाता या संघांमध्ये होणार आहे. चेन्नाईने चार वेळा आयपीएल जिंकले असूनतर कोलकाता संघ दोन वेळा आयपीएलमध्ये विजयी ठरला आहे.
जाणून घ्या चेन्नई आणि कोलकाताने केव्हा जिंकली आयपीएलची ट्रॉफी
महेंद्र सिंह धोनी कर्णधार असलेला चेन्नई या संघाने 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएल जिंकले आहे. तसेच गौतम गंभीर कर्णधार असताना कोलकाता संघ 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल सिझनमध्ये विजयी ठरला होता.
चेन्नईचे हे खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर
चेन्नईच्या संघाचे फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोइन अली आणि रवींद्र जडेजा यांनी सिझनमध्ये चांगली फलंदाजी केली असली तरी त्यांना या अंतिम सामन्यात वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन आणि सुनील नरेन या कोलकाताच्या स्पिन ट्रियोचा सामना करावा लागणार आहे. दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड आणि ड्वेन ब्रावो या चेन्नईच्या खळाडूंनी या सिझनमध्ये गोलंदाजी चांगली केली आहे.
कोलकाताच्या या खेळाडूंकडे असेल सर्वांची नजर
कोलकाताच्या संघाने आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात उत्तम कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी संघाला चांगल्या खेळाची सुरूवात करून दिली. कोलकाताचे फास्ट बॉलर्स लॉकी फर्ग्यूसन आणि शिवम मावी यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये कोलकाताच्या खेळाडूंच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष असेल
कोलकाताचा संघ
इयोन मोर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (व्हिकेट किपर), कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव,लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरेन, टिम सेफर्ट, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी, गुरकीरत मान सिंह
चेन्नईचा संघ
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डू प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिदी, मिशेल सेंटनर, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड़, शार्दुल ठाकुर, आर साई किशोर, मोइन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा आणि सी हरि निशांत.