IPL 2021 | आगामी सीझनपूर्वी सनराइजर्स हैदराबाद संघाबाबत डेव्हिड वॉर्नरचा दावा; म्हणाला...
आयपीएलच्या आगामी सीझनपूर्वी सनरायझर्स हैदराबादचा संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं कंबर कसली आहे. आपल्या संघाबाबत वॉर्नरने मोठा दावा केला आहे.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनचं आयोजन एप्रिल-मे महिन्यात करण्यात येणार आहे. अशातच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आगामी सीझनसाठी आपली कंबर कसली आहे. सोशल मीडियामार्फत डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.
डेव्हिड वॉर्नरने केलेल्या दाव्यानुसार, ते यावर्षी हैदराबादला विजयी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. तसेच वॉर्नर बोलताना म्हणाला की, "सनरायझर्स हैदराबाद एक शानदार टीम आहे. फॅन्स, स्टाफ, प्लेयर आणि ग्राउंड स्टाफ यांच्यासह हैदराबादकडे एक उत्तम संघ आहे. मी पुढच्या सीझनमध्ये संघाला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे."
View this post on Instagram
ग्रोइन इंज्युरीने ग्रस्त आहे वॉर्नर
34 वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वात सनरायझर्स हैदराबादचा संघ 2016च्या आयपीएलमध्ये आरसीबीला 8 धावांनी पराभूत करत विजयी झाला होता. गेल्या वर्षी डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर पुन्हा एकदा संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. परंतु, आपल्या संघातील अनुभवी खेळाडूंच्या दुखापतीमुळे हैदराबादचा संघ मागील सीझनमध्ये फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही.
दरम्यान, सनराझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सध्या ग्रोइन इंज्युरीने ग्रस्त आहे. वॉर्नरला गेल्या वर्षी टीम इंडियाच्या विरोधात वनडे सीरिजमध्ये दुखापत झाली होती. वॉर्नरचं म्हणणं आहे की, ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी 6 महिनेही लागू शकतात. वॉर्नर घरगुती क्रिकेटमधून वापसी करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :