एक्स्प्लोर

CSK in IPL : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईची विजयी सुरुवात; मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव

CSK vs MI Live: आयपीएलचा दुसरा टप्पा आज चेन्नई आणि मुंबई यांच्या सामन्याने सुरु झाला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.

CSK vs MI Live: आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत सहा गडी बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ 136 धावा करू शकला. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात 12 गुण आहेत.

या विजयासह चेन्नईने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.

चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली
नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर खाते उघडल्याशिवाय पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मोईन अलीही दुसऱ्या षटकात अॅडम मिल्नेच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला.

यानंतर अंबाती रायडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रायडूचा मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगलं रेकॉर्ड आहे. हे पाहता कर्णधार एमएस धोनीने त्याला बढती दिली. पण अॅडम मिल्लेच्या चेंडूवर दुखापत झाल्याने तो रिटायर हर्ट झाला. आणि नंतर सुरेश रैना क्रीजवर फार काळ टिकू शकला नाही. तो सहा चेंडूत फक्त चार धावा करून बाद झाला.

तीन षटकांत फक्त सात धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार एमएस धोनी क्रीजवर आला. पण त्यानेही निराशा केली आणि पाच चेंडूत तीन धावा केल्यावर तो बाद झाला. धोनीला अॅडम मिल्नेने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवर प्लेमध्ये चेन्नईची धावसंख्या चार गडी बाद 24 धावा होती.

जडेजा आणि गायकवाड यांची महत्त्वपूर्ण भागीदारी 
अवघ्या 24 धावांवर चार विकेट गेल्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. जडेजा 17 व्या षटकात 26 धावांवर बाद झाला. त्याने 33 चेंडूत आपल्या डावात एक चौकार ठोकला. बुमराहने आपला 100 वा सामना खेळत जडेजाला बाद केले.

एकीकडे, तू चल में आयाच्या धर्तीवर चेन्नईचे फलंदाज बाद होत होते. दुसरीकडे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आपला क्लास दाखवत होता. गायकवाडने नाबाद 88 धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. यूएईमध्ये गायकवाडचे हे सलग चौथे अर्धशतक आहे. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होनेही तीन षटकारांच्या मदतीने अवघ्या आठ चेंडूत 23 धावा केल्या.

अॅडम मिल्नने मुंबईसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 21 धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहनेही प्रत्येकी दोन बळी घेतले. पण हे दोघेही थोडे महागडे ठरले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावाSupriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Embed widget