एक्स्प्लोर

IPL 2020 | आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर पहिलाच खेळाडू!

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी 6 मोसमात 500 पेक्षा जास्त धावा बनवणारा वॉर्नर पहिलाच खेळाडू बनला आहे.

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या मोसमातील साखळी फेरी संपली आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 85 धावांच्या खेळीमुळे हैदराबादने मुंबई इंडियन्सवर दहा विकेट्सनी मात करुन प्लेऑफमध्ये धडक मारली. या खेळीसह वॉर्नरने या मोसमात 500 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी 6 मोसमात 500 पेक्षा जास्त धावा बनवणारा वॉर्नर पहिलाच खेळाडू बनला आहे.

सलग सहा मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या डेव्हिड वार्नरने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या या उत्तम कामगिरीचा सिलसिला 2014 मध्ये सुरु झाला. वॉर्नरने 2014 मध्ये 528 धावा केल्या होता. तर पुढच्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये 562 धावा करण्यात वॉर्नरला यश आलं.

सर्वात यशस्वी फलंदाज 2015 मध्ये दमदार कामगिरी करत डेव्हिड वॉर्नरने 848 धावा केल्या होता आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2017 मध्ये वॉर्नरने 641 धावा केल्या आणि आपला शानदार फॉर्म कायम ठेवला.

बॉल टेम्परिंग वादामुळे वॉर्नर 2018 च्या आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. परंतु 2019 मध्ये त्याने जबरदस्त कमबॅक करत 692 धावा बनवल्या. उत्तम कामगिरीचं बक्षीस म्हणून मागील वर्षी त्याच्याकडे पुन्हा एकदा संघाची धुरा सोपवली. डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या आयपीएलमधल्या साखळी फेरीत 501 धावा केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज आहे. वॉर्नरने 140 सामन्यांमध्ये 43.26 च्या सरासरीने 5235 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये वॉर्नरने चार शतकं आणि 48 अर्धशतकं केली आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM  : 4 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 04 Dec 2024 : ABP MajhaUddhav Thackeray On BMC Election : महापालिकेसाठी ठाकरेंची हिंदुत्वाची 'मशाल' Special ReportJankar vs Satpute  : हट्ट सोडला, संघर्ष टळला; Karadwadiत घटनात्मक पेच थोडक्यात टळला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Embed widget