एक्स्प्लोर
IPL 2020 : आयपीएलच्या खास रेकॉर्डपासून शिखर धवन केवळ 62 धावा दूर; कोहली, रोहित, रैना यांच्याशी बरोबरी
IPL 2020 आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे आहे. शिखर धवनला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पाच हजार धावा बनवण्याची संधी आहे.
IPL 2020 : दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवनला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध एका खास विक्रम गसवण्याची संधी आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावणारा शिखर धवन सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या तीन सामन्यांत क्रमाने 69,57 आणि नाबाद 101 धावा काढल्या आहेत. शिखर धवनने आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत 359 धावा केल्या आहेत.
सलामीवीर शिखर धवनने आतापर्यंत 168 सामन्यांत 23 वेळा नाबाद राहत 4938 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट जवळपास 126 आहे. त्याने आतापर्यंत 39 अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं आहे. सध्या तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. धवनने जर पंजाबविरुद्ध 62 धावा केल्या तर त्याच्या आयपीएलमधील पाच हजार धावा पूर्ण होतील.
IPL 2020 : पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर सीएसके; ऑरेंज, पर्पल कॅप कोणाकडे?
5000 धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे आहे. कोहलीने 186 सामन्यांत 5759 धावा काढल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैनाचं नंबर येतो. त्याने 193 सामन्यांत 5368 धावा बनवल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने 197 सामन्यांत 5168 धावा बनवल्या आहेत. शिखर धवनचं आयपीएलमधील पहिलं शतक शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात त्याने 14 चौकार आणि एक षटकार खेचला. धवनचं आयपीएलमधील हे पहिलं शतक ठरलं. यंदाच्या मोसमात लोकेश राहुल, मयांक अगरवाल यांच्यानंतर शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement