एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL 2020 Final : आकड्यांमध्ये दिल्लीच्या तुलनेत मुंबईचं पारडं जड; असे असतील संभाव्य संघ

IPL 2020 Final : तेराव्या सीझनमध्ये अंतिम लढतीआधी दिल्ली आणि मुंबई यांच्या तीन सामने खेळवण्यात आले आहेत. परंतु अद्याप दिल्लीला मुंबईवर विजय मिळवता आलेला नाही.

IPL 2020 Final : दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएल 13 चा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर दिल्ली पहिल्यांदा आयपीएलचा किताब पटकावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, जुने रेकॉर्ड पाहता मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडताना दिसणार आहे.

तेराव्या सीझनच्या याआधी दिल्ली आणि मुंबई यांच्या तीन सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांमध्ये लीग स्टेजआधी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. पुढिल दोन सामन्यांमध्येही मुंबई इंडियन्स दिल्लीवर भारी पडल्याचं दिसून आलं आहे. लीग स्टेजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सकडून 9 विकेट्सनी पराभव झाला.

क्वालिफायर वनमध्ये तर मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडला होता. मुंबईच्या विरोधात 201 धावांच लक्ष्य गाठताना दिल्लीने 0 च्या स्कोअरवरच तीन विकेट्स गमावले होते. मुंबई इंडियन्सने क्वालिफायर वनमध्ये दिल्लीचा 57 धावांनी पराभव करून फायनल्समध्ये जागा निर्माण केली.

दुबईमध्ये मुंबईचा रेकॉर्ड चांगला नाही

दिल्ली कॅपिटल्ससाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. तर केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहेत. मुंबईच्या तुलनेत दिल्लीच्या संघाने दुबईत आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 10 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विजय मिळवण्याच मुंबई सर्वात पुढे

आयपीएलच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये 27 वेळा लढती झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने 27 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 12 वेळा दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आहे.

संभाव्य संघ :

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शिखर धवन, शिमरन हेटमायेर, अक्षर पटेल, मार्कस स्टोयनिस, रविचंद्रन अश्विन, रबाडा, एनरिक नॉर्खिया, प्रवीन दुबे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव/क्रूणाल पांडया, कीरन पोलार्ड, जेम्स पैटिनसन/नाथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on CM Post | पायाला भिंगरी लावून मी कार्यकर्त्यांप्रमाणे काम केलं- एकनाथ शिंदेABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलीSanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
Embed widget