IPL 2020 : कोरोना काळात पार पडलेल्या 13व्या सीझनचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. अटी-शर्थींसह आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांचे पालन करत आयपीएल 2020 पारपडलं. देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने यूएईमध्ये आयपीएल 2020 चं आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. एका रिपोर्टनुसार, BCCI ने यासाठी UAE क्रिकेटबोर्डाला 100 कोटी रुपये दिले आहेत.


दरम्यान, आयपीएल 2020 चं आयोजन 29 मार्च रोजी करण्यात येणार होतं. बीसीसीआयने याचं शेड्यूलही जारी केलं होतं. परंतु, अचानक देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागूकरण्यात आला. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यानंतर सर्व शक्यतांची चाचपणी करून यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. जर आयपीएल 2020 चं आयोजन केलं गेलं नसतं आणि आयपीएल रद्द झाली असती, तर बीसीसीआयला जवळपास चार हजार कोटी रुपयांचं नुकसान भोगावं लागलं असतं. यूएईमध्ये आयपीएल 2020 चं आयोजन 19 सप्टेंबरपासून करण्यात आलं होतं. तसेच आयपीएल सुरु झाल्यानंतर संघांमधील एकाही खेळाडूला अथवा इतरांना कोरोनाची लागण झाली नाही.





बंगलोर मिररने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयपीएल 2020च्या आयोजनासाठी दुबई क्रिकेट बोर्डाला 100 कोटी रुपये दिले आहेत. रिपोर्टमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट बोर्डाने दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये आयपीएल 2020च्या आयोजनासाठी बीसीसीआयला 14 मिलियन डॉलर मोजावे लागले आहेत. आयपीएलचं आयोजन यूएईमध्ये झाल्यामुळे यूएई क्रिकेट बोर्डाला पैसे देण्यासोबतच आयपीएलला अनेक स्पॉन्सर्सही मिळाले आहेत.


10 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात आला होता आयपीएल 2020 चा अंतिम सामना


दरम्यान, यूएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरमध्ये आयपीएल 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे सर्व आठ संघ आपले खेळाडू आणि सपोर्टिंग स्टाफसह काही दिवसांपूर्वीच यूएईमध्ये दाखल झाले होते. यादरम्यान जवळपास तीन महिन्यांपर्यंत 14 फाइव्ह स्टार हॉटेल्स पूर्णपणे आयपीएलमधील सहभागी संघ आणि सपोर्टिंग स्टाफसाठी बुक होते.


महत्त्वाच्या बातम्या :