IPL 2022 : भुवनेश्वरचा मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज
IPL 2022, SRH vs PBKS : मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने(Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सात विकेटनं पराभव केला.
IPL 2022, SRH vs PBKS : मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने(Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सात विकेटनं पराभव केला. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि उमरान मलिक सनराजयर्स हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. भुवनेश्वर कुमारने तीन तर उमरान मलिकने चार विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारने पंजाबविरोधात भेदक मारा केला. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने मोठा विक्रमाला गवसणी घातली आहे. दरम्यान, आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 28 व्या पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) सामन्यात हैदराबादने आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी करत सात विकेट्सनी पंजाबवर विजय मिळवला आहे. आधी हैदराबादने उत्तम गोलंदाजीच्या जोरावर 151 धावांत पंजाबला रोखलं. ज्यानंतर मार्करम आणि पूरन यांच्या अभेद्य भागिदारीच्या जोरावर त्यांनी 18.5 षटकात 152 धावांचे लक्ष्य पार करत सात विकेट्सनी विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील चौथा विजय असल्याने ते गुणतालिकेतही चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.
पंजाबविरोधात भेदक मारा करत भुवनेश्वर कुमारने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये 150 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. आयपीएलमध्ये 150 विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार सातवा गोलंदाज आहे. तर अशी कामगिरी करणारा पाचवा भारतीय गोलंदाज आहे. पण 150 विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज झाला आहे. भुवनेश्वर कुमारने 2011 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. भुवनेश्वर कुमारने पुणे वॉरियर्ससाठी आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला होता. भुवनेश्वर कुमारने 138 सामन्यात 150 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारचा आयपीएलमधील सर्वोक्तृष्ट गोलंदाजी परफॉर्मेंस 19 धावा देऊन पाच विकेट हा आहे.
ब्रावोच्या नावावर सर्वाधिक विकेट –
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम चेन्नईच्या ड्वेन ब्रावोच्या नावावर आहेत. ब्रावोनंतर मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये 170 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर अमित मिश्राचा (166) क्रमांक लागतो., पीयूष चावला (157), युजवेंद्र चहल (151) आणि हरभजन सिंह (150) यांनीही 150 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाजाचा मान भुवनेश्वर कुमारने पटकावला आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहचा क्रमांक लागतो. बुमराहच्या नावावर 134 विकेट आहेत.