RR vs KKR, Pitch Report : आजची लढत राजस्थान विरुद्ध कोलकाता; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या 30 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR)हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत.
RR vs KKR, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR) या दोघांमध्ये सामना पार पडणार आहे. दोन्ही संघानी यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन-तीन विजय मिळवले असून आज जिंकणारा संघ चौथा विजय नावावर करणार आहे. आयपीएलमधील आजवरच्या इतिहासाचा विचार करता राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत.
या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं काहीसं जड असून त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राजस्थानला 11 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. आजच्या सामन्यात कोणते खेळाडू चांगली कामगिरी करतील याकडे सर्वांचे लक्ष असून पण तरी आतापर्यंतच्या खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
राजस्थान विरुद्ध कोलकाता अशी असेल ड्रीम 11 (RR vs KKR Best Dream 11)
विकेटकीपर- संजू सॅमसन
फलंदाज- श्रेयस अय्यर, जोस बटलर, नितीश राणा,
ऑलराउंडर- आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, शिमरॉन हेटमायर
गोलंदाज- उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळवला जाणार आहे. खेळपट्टीचा विचार करता याठिकाणी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होत आहे. समोर असणारे लक्ष्य पार करण्यात यश येत आहे. यामागील दव हे एक मोठे कारण आहे. सायंकाळच्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवामुळे अडचण होत असल्याने फलंदाजी करणाऱ्यांना फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्लीचे फिजियो कोरोना पॉझिटिव्ह
- PBKS vs SRH, IPL 2022: हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवन पंजाबचा कर्णधार; मयांक अग्रवाल संघाबाहेर, नेमकं कारण काय?
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द