(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS vs RR, Pitch Report : पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना खेळवला जाणार आहे.
PBKS vs RR, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. लखनौची स्पर्धेतील कामगिरी पाहता त्यांनी आज विजय मिळवल्यास त्यांच पुढील फेरीचं तिकीट जवळपास निश्चित होईल. पंजाबच्या संघानं आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं राजस्थान संघानं 10 सामन्यांपैकी सहा सामन्यात विजय आणि चार सामने गमावले आहेत. त्यामुळे पंजाबच्या तुलनेत राजस्थानची पुढील फेरीत जाण्याची शक्यता अधिक आहे. पण तरी दोन्ही संघांना आजचा विजय महत्त्वाचा असल्याने आज एक चुरशीचा सामना पाहायला क्रिकेटप्रेमींना मिळू शकतो.
आजवरच्या इतिहासाचा विचार करता पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे संघ तब्बल 23 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता राजस्थानचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
पंजाब विरुद्ध राजस्थान अशी असेल ड्रीम 11 (PBKS vs RR Best Dream 11)
विकेटकीपर- संजू सॅमसन, जोस बटलर
फलंदाज- देवदत्त पडिक्कल, भानुका राजपक्षा, मयांक अगरवाल
ऑलराउंडर- लियाम लिव्हिंगस्टोन, शिमरॉन हेटमायर.
गोलंदाज-प्रसिध कृष्णा, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना होणाऱ्या मुंबईतील वानखेडे मैदानातील सीमारेषा पाहता मोठा स्कोर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यात मागील काही सामन्यांपासून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. त्यात आजचा सामना दुपारी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी देखील घेऊ शकतो. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-