एक्स्प्लोर

Harshal Patel : एकाही गोलंदाजाला जे जमलं नाही ते हर्षल पटेलनं करुन दाखवलं, दुसऱ्यांदा पटकावली पर्पल कॅप

Harshal Patel : आयपीएल 2024 च्या पर्वात पर्पल कॅपचा मानकरी पंजाब किंग्जचा खेळाडू हर्षल पटेल ठरला. हर्षल पटेलनं 24 विकेट घेतल्या.

चेन्नई : आयपीएलच्या सतराव्या पर्वाचा अखेर समारोप झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं आठ विकेट राखून सनरायजर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरेनला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला. सर्वाधिक धावसंख्येसाठी दिली जाणारी मानाची ऑरेंज कॅप विराट कोहलीला मिळाली. विराट कोहलीच्या वतीनं ती ऑरेंज कॅप श्रेयस अय्यरनं स्वीकारली. तर, सर्वाधिक विकेटसाठी दिली जाणारी पर्पल कॅप हर्षल पटेलला मिळाली. हर्षल पटेलनं दुसऱ्यांदा पर्पल कॅप मिळवत इतिहास रचला. 

पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलनं पर्पल कॅप मिळवली आहे. हर्षल पटेल दोन वेगवेगळ्या संघांकडून पर्पल कॅप मिळवणारा आयपीएलमधील पहिला खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्जनं आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही मात्र हर्षल पटेलनं दमदार कामगिरी केली. हर्षल पटेलनं 14 मॅचमध्ये 24 विकेट 9.73  च्या इकोनॉमीनं घेतल्या आहेत. 

हर्षल पटेलनं दुसऱ्यांदा पर्पल कॅप मिळवली. यापूर्वी हर्षल पटेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना मिळवली होती. पंजाब किंग्ज जरी आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचलं नसलं तरी हर्षल पटेलनं मात्र दमदार कामगिरी केली आहे.  हर्षल पेटलनं आयपीएलच्या 17 व्या पर्वात 24  विकेट घेतलं. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती ऑरेंज कॅपच्य शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहिला. वरुण चक्रवर्तीनं 21 विकेट घेतल्या. 

हर्षल पटेलनं इतिहास रचला

हर्षल पटेलनं आतापर्यंत दुसऱ्यांदा आयपीएलच्या पर्पल कॅप मिळवली आहे.  2021 च्या हंगामात त्यानं आरसीबीकडून 32 विकेट घेतल्या होत्या. हर्षल पटेल दोन वेगवेगळ्या संघांकडून खेळताना पर्पल कॅप मिळवणारा पहिला खेळाडू ठरल आहे. ड्वेन ब्राव्हो आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी देखील दोनवेळा पर्पल कॅपवर नाव कोरलं आहे. मात्र, दोघांनी एकाच संघाकडून खेळताना अशी कामगिरी केली आहे. 

भुवनेश्वर कुमारनं सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना 2016 आणि 2017 ला पर्पल कॅप मिळवली. तर ड्वेन ब्राव्होनं 2013 आणि 2015 मध्ये पर्पल कॅप मिळवली होती.हर्षल पटेल हा एकमेव खेळाडू ठरला आहे की ज्या संघानं प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही त्या टीमच्या खेळाडूनं पर्पल कॅप मिळवली आहे. 

दरम्यान, पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यातीतून मुंबई इंडियन्स नंतर बाहेर पडला होता. मात्र, हर्षल पटेल यानं सतराव्या आयपीएलमध्ये पर्पल कॅप मिळवली आहे.

संबंधित बातम्या : 

IPL 2024: विराट कोहली, रोहित शर्मा ते MS धोनीपर्यंत...; पाहा आयपीएल 2024च्या हंगामातील सर्वात मोठे 5 वाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण, गरोदर महिलांना व्हायरसचा धोका अधिकVijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!Kolhapur Radhanagri Dam : राधानगरी धरण परिसरात रिमझिम पाऊस, पर्यटकांनी केली गर्दीABP Majha Headlines : 06 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police :  अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
सूर्या-कोहली नाही.. टीम इंडियाचे 'हे' 5 शिलेदार ठरतील गेमचेंजर!
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
Video: खोटं बोल पण रेटून बोल,सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरेंच्या काळात, ड्रग्जवरही बोलले गृहमंत्री फडणवीस
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
एका षटकात 43 धावा, इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई, 134 वर्षातील सर्वात खराब ओव्हर
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
हिरवा निसर्ग हा भोवतीने, 'राऊतवाडी धबधब्याची सफर' करा मस्तीने; पाणी प्रवाही झाल्याने पर्यटकांची गर्दी
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
विधानसभा निवडणुकीत वंचित पूर्ण ताकदीने उतरणार; महायुती, महाविकास आघाडीचे पुन्हा टेन्शन वाढवणार?
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं! 
Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल;  लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'
Embed widget