GT vs RR : राजस्थानच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आयपीएलमधील निचांकी धावसंख्या उभारली
GT vs RR : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या फायनल सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 130 धावा केल्या.
GT vs RR : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या फायनल सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 130 धावा केल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने भेदक मारा केला.. पांड्याने चार षटकात 17 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या आहे. त्याशिवाय आर साईं किशोरने दोन, मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पहिल्या डावात फक्त 130 धावा करत राजस्थान रॉयल्सने एक लाजिरवाणा विक्रम नावावर केलाय.
फायनलमध्ये दुसरी निचांकी धावसंख्या
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या उभारली आहे. याआधी मुंबई इंडियन्सने 2017 मध्ये प्रथम फंलदाजी करताना आठ गड्यांच्या मोबद्लयात 129 धावा केल्या होत्या. या निर्णायक सामन्यात मुंबईने एका धावांनी विजय मिळवला होता.. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना आठ गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा उभारल्या होत्या. प्रत्त्युत्तरदाखल रायजिंग पुणे सुपरजायंट 6 गड्यांच्या मोबदल्यात 128 धावांपर्यंत मजल मारु शकला.
आयपीएल फायनलमध्ये सर्वात निचांकी धावसंख्या -
129/8 मुंबई इंडियंस vs राइजिंग पुणे सुपरजायंट- 2017 (विजय)
130/9 राजस्थान रॉयल्स vs गुजरात टाइटंस- 2022
143/6 डेक्कन चार्जर्स vs रॉयल चैलेंजर्स बेंगलोर- 2009 (विजय)
148/9 मुंबई इंडियंस vs चेन्नई सुपर किंग्स- 2013 (विजय)
149/8 मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स 2019 (विजय)
राजस्थानची फलंदाजी फेल -
नाणेफेक जिंकत राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. एक मोठी धावसंख्या करुन गुजरातवर दबाव टाकण्याचा निर्धार राजस्थानने केला असावा, पण गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानचा हा निर्णय़ पुरता फसला. संघाची ठिक-ठाक झालेली सुरुवात नंतर मात्र संपूर्णपणे ढासळली. सलामीवीर यशस्वी आणि बटलर क्रिजवर असताना एक मोठी धावसंख्या होईल असं वाटतं होतं. यशस्वी फटकेबाजी देखील करत होता. पण 22 धावा करुन तो बाद झाल्यानंतर मात्र राजस्थानचा डाव धीमा झाला. यशने ही विकेट घेतली होती. त्यानंतर कर्णधार संजू बटलर सोबत डाव सांभाळत असतानाच गुजरातचा कर्णधार हार्दिकने संजूला बाद केलं. ज्यानंतर काही वेळातच पडिक्कलही बाद झाला. पण बटलर क्रिजवर असल्यामुळे सर्वांना आशा होती, पण पांड्याने आणखी एक दमदार चेंडूवर बटलरलाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. बटलरच्या 39 धावा सर्वाधिक राहिल्या. हिटमायर आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 11 तर रियानने 15 धावांची खेळी केली. संपूर्ण संघ मिळून केवळ 130 धावाच करु शकला आहे.