LSG vs GT : हार्दिकची बॅट तळपणार की कृणालची गोलंदाजी चालणार? गुजरात विरुद्ध लखनौ सामन्याबाबतच्या या रंजक गोष्टी माहितीय?
GT vs LSG, IPL 2023 : आज नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात (Gujrat Titans) आणि लखनौ (Lucknow Super Giants) या दोन संघामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्याबाबतच्या या रंजक गोष्टी जाणून घ्या.
GT vs LSG Interesting Stats : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडरमधील पहिला सामना गुजरात आणि लखनौ या दोन संघात पाहायला मिळणार आहे. पांड्या ब्रदर्स आज क्रिकेटच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज 7 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
आयपीएल गुणतालिकेत दोन्ही संघ टॉप-4 मध्ये आहेत. गुजरात टायटन्स (GT) पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर तर आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असून कृणाल पांड्या लखनौ सुपर जायंट्सची कमान सांभाळणार आहे.
गुजरात आणि लखनौ या दोन संघामधील सामन्याबाबत काही रंजक माहिती जाणून घ्या...
- रवी बिश्नोई समोर हार्दिकची दमदार बॅटिंग पाहायला मिळते. हार्दिक पांड्याचा टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाज रवी बिश्नोई विरुद्ध 220 चा स्ट्राईक रेट आहे.
- कृणाल पांड्यासमोर शुभमन गिलचा टिकाव लागत नाही. शुभमन गिल टी20 क्रिकेटमध्ये कृणाल पांड्यासमोर बॅट जास्त स्विंग करू शकत नाही. कृणालसमोर शुभमनचा स्ट्राईक रेट फक्त 78.37 आहे.
- मोहम्मद शमीने कृणाल पांड्याला 5 डावात 3 वेळा बाद केलं आहे. राशिद खाननेही कृणालला 7 डावात 3 वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.
- मोहम्मद शमी आयपीएल 2023 मध्ये पॉवरप्लेचा सर्वात धोकादायक गोलंदाज ठरला आहे. त्याने पॉवर प्लेमध्ये (1-6 षटके) सर्वाधिक बळी (12) घेतले आहेत.
- मोहम्मद शमी आणि क्विंटन डिकॉक यांच्यात चेंडू आणि बॅटमध्ये चुरशीची लढत झाली आहे. डिकॉकने शमीच्या 30 चेंडूंचा सामना केला आणि 146 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यादरम्यान शमीने डिकॉकलाही तीन वेळा बाद केलं आहे.
- काइल मेयर्स या आयपीएल हंगामात 169 च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटने फिरकीपटूंविरुद्ध धावा करत आहे, पण तो आठ डावांत सहा वेळा फिरकीपटूंचा बळीही ठरला आहे.
- अमित मिश्राने हार्दिक पांड्याला 14 चेंडूत दोनदा बाद केलं आहे.
GT Probable Playing 11 : गुजरात संभाव्य प्लेईंग 11
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ.
LSG Probable Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11
काइल मेयर्स, मनन वोहरा, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान.