(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : क्विंटनची एन्ट्री, गुजरातची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
GT vs LSG, IPL 2023 : लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
GT vs LSG, IPL 2023 : लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कृणाल पांड्याने हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. लखनौचा संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्या भावनिक झालेला दिसला. दोन भाऊ आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेृत्वात करत आहेत.
गुजरात आणि लखनौ दोन्ही संघात एक एक बदल करण्यात आला आहे. लखनौच्या संघात क्विंटन डि कॉक याची एन्ट्री झाली आहे. तर गुजरातच्या संघात अल्जारी जोसेफ याला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय. पाहूयात दोन्ही संघात कोण कोण खेळाडू आहेत..
GT Playing 11 : गुजरातची प्लेईंग 11
वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ.
LSG Playing 11 : लखनौची प्लेईंग 11
काइल मेयर्स, क्विंटन डिकॉक,आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), रवी बिश्नोई, मोहसिन खान, आवेश खान, स्वप्निल सिंह
GT vs LSG Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि गुजरात (GT) या संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड दिसून आलं आहे. गुजरात टायटन्स संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत, पण लखनौला एकही सामना जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात लखनौ नवा इतिहास रचणार की गुजरात पुन्हा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.
GT vs LSG IPL 2023 : लखनौ की गुजरात कोण ठरणार वरचढ?
आयपीएल गुणतालिकेत गुजरात (GT) आणि लखनौ दोन्ही संघ टॉप 4 मध्ये आहेत. गुजरात टायटन्स संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता गुजरात संघ यंदाच्या मोसमातही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात संघाने आतापर्यंतच्या दहा पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे लखनौ संघाने आतापर्यंत दहापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.