एक्स्प्लोर

GT vs CSK, IPL 2023 Qualifier 1 Live: फायनलमध्ये कोण जाणार? हार्दिक-धोनीमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IPL 2023, Qualifier 1, GT vs CSK: चेपॉक स्टेडिअमवर गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यात लढत होणार आहे. विजेता संघ फायनलमध्ये धडक मारेल.

LIVE

Key Events
GT vs CSK, IPL 2023 Qualifier 1 Live: फायनलमध्ये कोण जाणार? हार्दिक-धोनीमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

GT vs CSK Qualifier 1 Live: 

आयपीएल 2023 (IPL 2023) चा पहिला क्वालिफायर (Qualifier 1) सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर (Chepauk Stadium) चेन्नई आणि गुजरात या संघात खेळवला जाणार आहे. आयपीएलचा यंदाचा सोळावा हंगाम फारच रोमांचक ठरला आहे. शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शर्यत सुरु होती. आज आयपीएल 2023 मधील पहिला क्वालिफायर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघ यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे.

पहिला क्वालिफायर सामना चेन्नई विरुद्ध गुजरात 

चेन्नई आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. गुजरात संघाने 14 पैकी 10 सामने जिंकून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे, चेन्नई संघाने 14 सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे गुजरात आणि चेन्नईमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार आहे जाणून घ्या.

गुजरात संघाचं पारड जड

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई संघावर पांड्याचा गुजरात संघ भारी पडला आहे. गुजरात संघ हंगामाच्या सुरुवातीपासूनच टॉप 4 मध्ये पाय रोवून आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई संघाला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई संघाने खातं थोडं उशिरा उघडलं मात्र, शेवटी चेन्नई संघानं दमदार प्रदर्शन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.

गुजरात संघ चेस मास्टर

गुजरात टायटन्स संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची फलंदाजी. गुजरात संघ चेस मास्टर आहे. आतापर्यंत त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना फक्त तीन सामने गमावले आहेत. त्याचबरोबर गुजरातची गोलंदाजीही काही प्रमाणात चांगली आहे. त्यांच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. पण वेगवान गोलंदाजी त्यांची बाजू कमजोर आहे. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्यास संघाला खूप अडचणीत येतात.

चेन्नईची टॉप ऑर्डर जमेची बाजू

चेन्नई सुपर किंग्सची सर्वात मोठी ताकद ही त्यांची टॉप ऑर्डर आहे. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या फलंदाजीला तोड नाही. याशिवाय शिवम दुबेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये धावा जमवताना दिसत आहे. पण या तीन फलंदाजांव्यतिरिक्त मधल्या फळीतील किंवा खालच्या मधल्या फळीतील कोणत्याही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये चेन्नईची आघाडीची फळी ढासळली तर त्यामुळे गुजरात संघाला फायदा होऊ शकतो.

23:29 PM (IST)  •  23 May 2023

धोनीच्या चेन्नईची थाटात फायनलमध्ये धडक, गुजरातवर 15 धावांनी विजय

धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरातचा पारभव करत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने पहिल्यांदाच गुजरातचा पराभव केला.. याआधी झालेल्या तिन्ही सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. चेन्नईने दहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.. चेन्नईचा संघ २८ मे रोजी पाचव्या आयपीएल चषकासाठी मैदानात उतरले.

23:24 PM (IST)  •  23 May 2023

धोनीच्या चेन्नईची फायनलमध्ये धडक

धोनीच्या चेन्नईची फायनलमध्ये धडक 

23:15 PM (IST)  •  23 May 2023

गुजरातला मोठा धक्का

गुजरातला मोठा धक्का... राशिद खान बाद

23:08 PM (IST)  •  23 May 2023

आठवा धक्का

गुजरातला आठवा धक्का बसलाय.. दर्शन नळकांडे बाद

23:07 PM (IST)  •  23 May 2023

गुजरातला सातवा धक्का

गुजरातला सातवा धक्का बसलाय.. विजय शंकर बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget