IPL 2024: विराटच्या होमग्राऊंडवर चाहत्याला मिळालं शिळं अन्न, चिन्नास्वामीच्या मॅनेजरविरोधात गुन्हा
IPL 2024 : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा वेगवेगळ्या घटना घडतात. कधी चाहता मैदानात धावत जातो, तर कधी स्टेडियममध्ये दोन चाहत्यांमध्येच हाणामारी होते. यासारख्या अनेक घटना क्रिकेटच्या मैदानात घडतात.
IPL 2024 : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा वेगवेगळ्या घटना घडतात. कधी चाहता मैदानात धावत जातो, तर कधी स्टेडियममध्ये दोन चाहत्यांमध्येच हाणामारी होते. यासारख्या अनेक घटना क्रिकेटच्या मैदानात घडतात. पण आरसीबीचं होमग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियमवर चाहत्यांना शिळं अन्न दिल्याचं प्रकरण समोर आलेय. 23 वर्षीय चाहत्याने याबाबत पोलितांत धाव घेतली असून गुन्हा दाखल केलाय. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशियशन (KSCA) विरोधात चाहत्यानं पोलिसात धाव घेतली. दिल्लीविरोधातील सामन्यावेळी 23 वर्षीय चाहत्याला शिळं अन्न देण्यात आले. त्यामुळे त्याला त्रास झाला. त्यामुळे त्याने पोलिसांत धाव घेतला. दिल्लीविरोधात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने 47 धावांच्या मोठ्या फरकाने विजय नोंदवलाय.
23 वर्षीय चैतन्य नावाच्या तरुणाने KSCA विरोधात कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केला आहे. ज्यामध्ये चैतन्य यानं शिळं अन्न दिल्याचा आरोप केला आहे. 12 मे रोजी आरसीबी आणि दिल्ली यांच्याविरोधात आमनासामना झाला होता. चैतन्य हा सामना पाहण्यासाठी गौतम या आपल्या मित्रासोबत पोहचला होता. सामन्यावेळी चैतन्य आणि गौतम यांनी कॅन्टिनमध्ये जेवन केले. यावेळी त्यांनी गुलाब जामून, दाळ-भात आणि इतर गोष्टींवर ताव मारला. पण हे अन्न खाल्ल्यामुळे त्रास झाला, पोटदुखी झाली. तो बेशुद्धही झाला. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमध्ये चैतन्य यानं सर्वबाबी सांगितल्यात. कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये चैतन्य यानं KSCA विरोधात गुन्हा दाखल केला.
Stadium food is always stale! Just me or is this common violation? 😵💫
— Nabila Jamal (@nabilajamal_) May 16, 2024
*FIR against KSCA management for allegedly serving stale food at RCB vs Delhi Capitals match on May 12 at Chinnaswamy Stadium. 23-year-old Chaitanya collapsed after eating Ghee Rice, Channa Masala, cutlet,… pic.twitter.com/PenmvOIjAo
शिळे अन्न खाल्ल्यानंतर चैतन्य याला पोटदुखी झाली. तो थोडावेळ बेशुद्धही पडला. त्यानंतर त्याला प्राथमिक उपाचर दिले. त्याशिवाय मैदानाबाहेर त्याच्यासाठी रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करुन दिली. चैतन्य याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयाने 23 वर्षीय चैतन्य याच्यावर तात्काळ उपचार केले. डॉक्टरांच्या रिपोर्ट्समध्ये चैतन्य याला फूट पॉयझनिंग झाल्याचं समोर आले. कॅन्टिंगमधील जेवण केल्यामुळेच चैतन्य याला त्रास झाल्याचा दावा केला जातोय. याप्रकरणाबाबत चैतन्य यानं पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल केला, त्यावेळी त्याने रुग्णालायचे रिपोर्टही दिले. कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) मॅनेजमेंट आणि कँटीनच्या मॅनजेरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.