एक्स्प्लोर

DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 155 धावांचं लक्ष्य; श्रेयस अय्यरची शानदार खेळी

Delhi vs Rajasthan: दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 43 धावा केल्या. दुसरीकडे, शिमरॉन हेटमायरने 28 आणि कर्णधार पंतने 24 धावा केल्या.

Delhi Capitals vs Rajasthan Royals: अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या 36 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. नाणेफेक गमावल्यानंतर बॅटींग करायला उतरलेल्या दिल्लीची चांगली सुरुवात झाली नाही. पण, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी चांगले डाव खेळून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. दुसरीकडे, राजस्थानकडून मुस्ताफिझूर रहमान आणि चेतन साकरिया यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा सलामीवीर शिखर धवन चौकाराच्या मदतीने आठ चेंडूंमध्ये केवळ आठ धावा करू शकला. त्याचबरोबर पृथ्वी शॉची बॅटही पुन्हा एकदा शांत राहिली. तो 12 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

श्रेयस अय्यर आणि कर्णधार पंत यांनी दोन्ही सलामीवीर केवळ 21 धावांवर बाद झाल्यानंतर डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. अय्यरने 32 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्याचवेळी पंत 24 चेंडूत दोन चौकारांसह केवळ 24 धावा करू शकला.

दिल्ली चांगल्या स्थितीत आली अन् दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शिमरॉन हेटमायरने राजस्थानच्या फलंदाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्याने 16 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमानने हेटमायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर अक्षर पटेल सात चेंडूत 12 धावा करून बाद झाला. मात्र, मार्कस स्टोइनिसच्या जागी संघात सामील झालेला ललित यादव 15 चेंडूत 14 धावांवर नाबाद परतला आणि आर अश्विनने सहा चेंडूत सहा धावा केल्या. दोघांनीही दिल्लीचा स्कोर 150 च्या पुढे नेला.

दुसरीकडे, राजस्थानकडून मुस्तफिजूर रहमानने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 22 धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय चेतन साकरियाने 33 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Shiv Jayanti: बाहेर वादळ असतं तेव्हा आत शांत बसून शक्ती साठवून ठेवावी अन् शांतता असताना वादळ निर्माण करावं; शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल
माझ्यावर शिवचरित्राचा प्रभाव, मला कधीच नकारात्मकता स्पर्श करत नाही; शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
Vijay Wadettiwar:  औरंगजेबाची कबर खोदण्यापूर्वी आपण केलेल्या पापांची कबर खोदावी; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात 
औरंगजेबाची कबर खोदण्यापूर्वी आपण केलेल्या पापांची कबर खोदा; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल  
Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या मुख्य मारेकऱ्याचा पत्ता अखेर सापडला; पंजाब पोलिसांनी लोकेशन शोधून काढले
माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या मुख्य मारेकऱ्याचा पत्ता अखेर सापडला; पंजाब पोलिसांनी लोकेशन शोधून काढले
Beed Crime:  मुलीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् वडील संतापले; बीडमधील ट्रकचालक तरुणाच्या हत्याप्रकरणाचं खरं कारण समोर
मुलीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् वडील संतापले; बीडमधील ट्रकचालक तरुणाच्या हत्याप्रकरणाचं खरं कारण समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 March 2025Vijay Wadettiwar on Aurangzeb Kabar | औरंगजेबाची कबर खोदण्याआधी आपण केलेल्या पापाची कबर खोदावीMLC Election Maharashtra | विधान परिषदेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray Shiv Jayanti: बाहेर वादळ असतं तेव्हा आत शांत बसून शक्ती साठवून ठेवावी अन् शांतता असताना वादळ निर्माण करावं; शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल
माझ्यावर शिवचरित्राचा प्रभाव, मला कधीच नकारात्मकता स्पर्श करत नाही; शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
Vijay Wadettiwar:  औरंगजेबाची कबर खोदण्यापूर्वी आपण केलेल्या पापांची कबर खोदावी; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात 
औरंगजेबाची कबर खोदण्यापूर्वी आपण केलेल्या पापांची कबर खोदा; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल  
Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या मुख्य मारेकऱ्याचा पत्ता अखेर सापडला; पंजाब पोलिसांनी लोकेशन शोधून काढले
माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या मुख्य मारेकऱ्याचा पत्ता अखेर सापडला; पंजाब पोलिसांनी लोकेशन शोधून काढले
Beed Crime:  मुलीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् वडील संतापले; बीडमधील ट्रकचालक तरुणाच्या हत्याप्रकरणाचं खरं कारण समोर
मुलीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् वडील संतापले; बीडमधील ट्रकचालक तरुणाच्या हत्याप्रकरणाचं खरं कारण समोर
Narayan Rane : 'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
Maharashtra News LIVE Updates :  भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
Maharashtra News LIVE Updates : भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
IPO Update : संरक्षण क्षेत्रातील कंपनी 5000  कोटींचा आयपीओ आणणार, पैशांचं नियोजन करुन ठेवा, कमाईची मोठी संधी
IPO Update : संरक्षण क्षेत्रातील कंपनी 5000 कोटींचा आयपीओ आणणार, पैशांचं नियोजन करुन ठेवा, कमाईची मोठी संधी
Embed widget