Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सेहवागकडून गंभीर प्रश्न
CSK vs RR : चेन्नईने राजस्थानचा पाच विकेटने पराभव करत प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवलेय.
Fixing Questions On IPL 2024 CSK vs RR : चेन्नईने राजस्थानचा पाच विकेटने पराभव करत प्लेऑफचं आव्हान जिवंत ठेवलेय. रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान आयपीएल 2024 चा 61 वा सामना पार पडला. पण या सामन्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सोशल मीडियावर हा सामना फिक्स असल्याचा आरोप केला जात आहे. माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारी यांनी या सामन्याबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले. राजस्थानच्या खेळावर नेटकऱ्यांनी सवाल उपस्थित केलाय, हा सामना फिक्स होता का ? असा सवाल उपस्थित केला जातोय.
वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारी यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये सेहवाग आणि तिवारी यांनी राजस्थानच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चेन्नईविरोधात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी निराशाजनक फलंदाजी केली. संथ फलंदाजी केल्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी सवाल उपस्थित केलेत.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात 141 धावा फलकावर लावल्या. राजस्थान रॉयल्ससाटी रियान पराग यानं 35 चेंडूमधझ्ये तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद 47 धावांचं योगदान दिले. रियान परागचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी खूपच संथ फलंदाजी केली, त्यानंतर विकेट फेकली. यशस्वी जायस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर यांच्या खेळावर प्रश्न उपस्थित केला. यशस्वी जायस्वाल याने 21 चेंडूत 24, जोस बटलर 25 चेंडूत 21 आणि संजू सॅमसन याने 19 चेंडूत 15 धावांची संथ खेळी केली. त्यामुळेच राजस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानच्या फलंदाजीवर अनेकांनी सवाल उपस्थित केलाय.
क्रिकबजच्या एका कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारी यांनी राजस्थानच्या संथ खेळावर सवाल उपस्थित केले. मनोज तिवारी म्हणाला की आयपीएल 2024 ची सुरुवात झाली, तेव्हा राजस्थानचे फलंदाज फरारीसारखे चालत होते. माहिच नाही अचानक काय झाल.. प्रचंड उकाड्यामुळे असं घडू शकतं. पण धावा काढण्याचे प्रयत्न दिसायला हवेत. धावा कमी झाल्या, समजू शकतो. पण प्रयत्न करायला तर हवेत ना? तुमच्याकडे सात विकेट हातात होत्या... 19 व्या षटकात तुमचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
View this post on Instagram
वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, संजू सॅमसन फलंदाजी आला, तो आरामात खेळात होता. जसं की तो वनडे क्रिकेट खेळत होता. खेळपट्टी तितकीही खराब नव्हती. चेंडू स्विंगही होत नव्हता. तरीही जाडेजाचे चार षटकं आरामात खेळली गेली. हे समजलं नाही.
राजस्थानचा लागोपाठ तिसरा पराभव -
पहिल्या टप्प्यात लागोपाठ सामने जिंकणाऱ्या राजस्थानची कामगिरी सध्या निराशाजनक होत आहे. राजस्थान रॉयल्सला लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 16 गुण असतानाही राजस्थानचा संघ अद्याप प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. राजस्थानच्या प्लेऑफवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. राजस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्याचा फटका बसलेला दिसत आहे.