CSK vs RCB Score Live IPL 2024: चेन्नईची विजयानं सुरुवात,आरसीबीच्या नशिबी चेपॉकवर पुन्हा पराभव

CSK vs RCB Score Live IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या विश्वातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाला आज पासून प्रारंभ होणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 22 Mar 2024 11:54 PM
चेन्नईचा 6 विकेटनं विजय, आरसीबीचा पहिल्याच सामन्यात पराभव

चेन्नईनं आरसीबीवर 6 विकेटनं विजय मिळवला आहे. आरसीबीला चेपॉकवर पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे.  

CSK : चेन्नईला विजयासाठी 18 बॉलमध्ये 18 धावांची गरज

चेन्नईनं 17 व्या ओव्हरपर्यंत 4 विकेटवर 156 धावा केल्या आहेत. आता त्यांना विजयासाठी 18 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 

चेन्नईला चार ओव्हर्समध्ये विजयासाठी 24 धावांची गरज

चेन्नईला चार ओव्हर्समध्ये विजयासाठी 24 धावांची गरज आहे. चेन्नईनं 16 ओव्हर्समध्ये 140 धावा केल्या आहेत. 

चेन्नईला 4 था धक्का , डॅरेल मिशेल बाद

चेन्नईला 4 था धक्का बसला आहे. डॅरेल मिशेल 22 धावा करुन बाद झाला आहे.  

CSK Score : चेन्नईच्या 100 धावा पूर्ण , अजिंक्य रहाणे बाद

चेन्नईच्या 11 व्या ओव्हरला 100 धावा पूर्ण झाल्या असून अजिंक्य रहाणे 27 धावा करुन बाद झाला. 

CSK : चेन्नईच्या 10 ओव्हर्समध्ये 92 धावा

चेन्नई सुपर किंग्जनं 10 ओव्हर्समध्ये 2 बाद 92 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिशेलनं डाव सावरला आहे. 

चेन्नईला वादळी सुरुवात करुन दिली, आक्रमक फटकेबाजीच्या नादात राचीन रविंद्र आऊट

चेन्नईला वादळी सुरुवात करुन देत फटकेबाजीच्या नादात राचीन रविंद्र आऊट झाला आहे. राचीन रविंद्रनं 15 बॉलमध्ये 37 धावा केल्या.  

CSK vs RCB : चेन्नईच्या पॉवरप्लेमध्येच 50 धावा पूर्ण

चेन्नई सुपर किंग्जनं  पॉवरप्लेमध्येच 50 धावा पूर्ण केल्या आहेत. चेन्नईनं एका विकेटवर सहा ओव्हरमध्ये 62 धावा केल्या आहेत. 

चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड 15 धावांवर बाद

चेन्नईला  पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड 15 धावांवर बाद 

CSK vs RCB : चेन्नईच्या डावाला सुरुवात

CSK vs RCB : चेन्नईच्या डावाला सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि राचिन रवींद्र यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली आहे.


 

RCB : आरसीबीचा डाव अनुज रावत अन् दिनेश कार्तिकनं सावरला, चेन्नईपुढं विजयासाठी 174 धावांचं आव्हान

आरसीबीचा डाव अनुज रावत अन् दिनेश कार्तिकनं सावरला, चेन्नईपुढं विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या 95 धावांच्या भागिदारीनं आरसीबीनं कमबॅक केलं. 

RCB Score : अनुज रावत आणि दिनेश कार्तिकनं बंगळुरुचा डाव सावरला

अनुज रावत आणि दिनेश कार्तिकनं बंगळुरुचा डाव सावरला असून 18 व्या ओव्हरपर्यंत बंगळुरुच्या 5 बाद148 धावा झाल्या आहेत.

RCB vs CSK : अखेर आरसीबीच्या 100 धावा पूर्ण

अखेर आरसीबीच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. आरसीबीचा डाव अनुज रावत आणि दिनेश कार्तिकनं सावरला आहे.

Virat Kohli : विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन बाद , आरसीबीला धक्के सुरुच

विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन बाद , आरसीबीला धक्के सुरुच

RCB Score : आरसीबीच्या पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 3 बाद 75 धावा

आरसीबीनं पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 3 बाद 75 धावा केल्या आहेत. फाफ डु प्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि ग्रीननं आरसीबीचा डाव सावरला आहे. 

RCB Live Score : आरसीबीच्या 8 ओव्हर्सनंतर 55 धावा

 फाफ डु प्लेसिस 35 धावांच्या आक्रमक खेळीनंतर बाद झाल्यानंतर आरसीबीचा वेग मंदावला आहे. आरसीबीच्या 8 ओव्हर्सनंतर तीन बाद 55 धावा झाल्या आहेत.  

RCB Score : चेन्नईचा बंगळुरुला तिसरा धक्का

RCB Score : चेन्नईनं बंगळुरुला तिसरा धक्का दिला आहे. पॉवरप्लेमध्ये बंगळुरुची तिसरी विकेट गेली आहे. ग्लेन मॅक्सवेल शुन्यावर बाद झाला आहे.  

बंगळुरुला सलग दोन धक्के

बंगळुरुला सलग दोन धक्के बसले आहेत. आक्रमक फलंदाजी करणारा फाफ डु प्लेसिस 35 धावांवर बाद झाला. तर, रजत पाटीदार खातं देखील उघडू शकला नाही.

RCB Score : आरसीबीच्या तीन ओव्हर्समध्ये बिनबाद 33 धावा

आरसीबीच्या तीन ओव्हर्समध्ये बिनबाद 33 धावा झाल्या आहेत. फाफ डु प्लेसिसनं 30 धावा केल्या आहेत. 

आरसीबीच्या दोन ओव्हरनंतर 20 धावा

आरसीबीच्या दोन ओव्हरनंतर 20 धावा झाल्या आहेत. फाफ डु प्लेसिसनं आक्रमक सुरुवात केली आहे. 

CSK vs RCB : बंगळुरुच्या डावाला सुरुवात

CSK vs RCB : बंगळुरुच्या डावाला सुरुवात  झाली आहे. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर आली आहे.


 

Chennai Playing Eleven : चेन्नईची प्लेईंग 11

चेन्नईची प्लेईंग 11 - 


रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, डॅरेल मिचेल, महिश तिक्ष्णा, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, दीपक चाहर

RCB Playing Eleven : आरसीबीची प्लेईंग 11

आरसीबीची प्लेईंग 11 - 


फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, मयांक डांगर, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ

RCB Won the Toss : आरसीबीनं टॉस जिंकला, बंगळुरुचा बॅटिंगचा निर्णय

आरसीबीची कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकला आहे. आरसीबीनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

IPL Opening Ceremony : आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत ए.आर. रहमानचं सादरीकरण

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत ए.आर. रहमानचं सादरीकरण





RCB : आरसीबीचा चेपॉकवर सातवेळा पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं आयपीएलमध्ये चेपॉकच्या स्टेडियमवर सातवेळा पराभव स्वीकारला आहे. आजच्या मॅचमध्ये आरसीबी विजयी होणार का हे पाहावं लागणार आहे.


 

IPL Opening Ceremony : आयपीएलच्या ओपनिंग कार्यक्रमात दिग्गज कलाकारांचं सादरीकरण

आयपीएलच्या ओपनिंग कार्यक्रमात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, ए.आर. रहमान यांनी सादरीकरण केलं. 

IPL Opening Ceremony : अक्षय कुमारची चेपॉकवर तिरंगा हातात घेऊन एंट्री, टायगर श्रॉफ देखील सहभागी 

अक्षय कुमारची चेपॉकवर तिरंगा हातात घेऊन एंट्री, टायगर श्रॉफ देखील सहभागी 

Virat Kohli : आरसीबीच्या एलिस पेरीची विराट कोहलीबाबत पोस्ट चर्चेत

एलिस पेरीची विराट कोहलीबाबत पोस्ट चर्चेत





MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पहिल्या मॅचसाठी सज्ज

महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पहिल्या मॅचसाठी तयार





MS Dhoni : जडेजा आणि दुबेची फटकेबाजी पाहून धोनी अवाक

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेची सराववेळी सुरु असलेली फटकेबाजी पाहून आश्चर्यचकीत झाला.





IPL Opening Ceremony : आयपीएलच्या ओपनिंग कार्यक्रमात कलाकारांची हजेरी

ए. आर.रहमान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि सोनू निगम आयपीएलच्या ओपनिंग कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून सरफराज खानच्या वडिलांना थार गिफ्ट

लोकप्रिय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना थार भेट दिली आहे.





CSK Anthem IPL 2024 : चेन्नईच्या टीमकडून आयपीएल 2024 साठी अॅन्थम साँग रिलीज

CSK Anthem IPL 2024 : चेन्नईच्या टीमकडून आयपीएल 2024 साठी अॅन्थम साँग रिलीज





अफगाणिस्तानच्या चाहत्यानं विराट आणि स्मृती मानधनाचं चित्र कलिंगडावर रेखाटलं

अफगाणिस्तानच्या चाहत्यानं विराट आणि स्मृती मानधनाचं चित्र कलिंगडावर रेखाटलं





आयपीएलचं 17 वं पर्व सुरु होण्यास काही तास शिल्लक, चेन्नई आणि बंगळुरुचे चाहत्यांची उत्सुकता शिगेला

आयपीएलचं 17 वं पर्व सुरु होण्यास काही तासांचा वेळ शिल्लक राहिला आहे. चेन्नई आणि बंगळुरुच्या संघात पहिली मॅच होणार असल्यानं दोन्ही संघांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

'सीएसकेविरुद्ध खेळणं म्हणजे स्पेशल'

विराट कोहली म्हणाला की, चेन्नईविरुद्ध खेळणे ही विशेष संधी आहे. ही एक मोठी स्पर्धा आहे. चेन्नईच्या चाहत्यांमध्ये खेळणं मजेदार आहे. तसेच एमएस धोनीला भेटून बरं वाटतं, असं कोहलीने सांगितले.





गुजरातच्या संघात बी.आर. शरथ आणि राजस्थानच्या ताफ्यात तनुष कोटियन दाखल

एमएस धोनीला भेटण्यास विराट कोहली उत्सुक-

आरसीबीचा फलंदाज विराट कोहली चेन्नईचा फलंदाज विराट कोहलीला भेटण्यास खूप उत्साहित आहे. अनेक महिन्यांनंतर विराट कोहली आणि एमएस धोनीची आज चेन्नईत भेट होणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 12th मॅन आर्मी सज्ज...

धोनी-रोहितला जमलं नाही ते विराटनं केलं, IPL मध्ये 17 वर्षे एकाच संघाकडून खेळला किंग!

IPL 2024 : वेळापत्रक, कोणत्या संघाचा कर्णधार कोण? बक्षिसाची रक्कम किती ? A टू Z माहिती

CSK vs RCB सामन्यासाठी तिकिटांची किंमत किती, खरेदी कसं कराल?

अनेकांना ऑनलाईन तिकिट खरेदी करायचं असते, Paytm Insider संकेतस्थळामार्फत तुम्हाला तिकिट उपलब्ध झाल्यास नोटिफिकेशन मिळू शकतं. तुम्ही उपलब्ध असल्यास रिक्त तिकिट खरेदी करु शकता. तिकिटाची किंमत 1500 ते 7500 रुपये इतकी आहे. दरम्यान, आयपीएल 2024 साठी आतापर्यंत फक्त 21 सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. देशात सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे फक्त पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. उर्वरित वेळापत्रक थोड्याच दिवसात जाहीर होणार आहे. 

RCB चा दिग्गज IPL 2024 नंतर होणार निवृत्त, 2008 पासून खेळतोय आयपीएल
IPL 2024 Opening Ceremony Live Updates : प्रक्षेपण, तारीख, वेळ, ठिकाण; कलाकारांच्या यादीत अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे

चेन्नईत आज अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, एआर रहमान आणि सोनू निगम यांच्या काही उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळतील.

यंदाच्या हंगामात कोणत्या संघाची धुरा कोण संभाळणार?

चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड
Chennai Super Kings: Ruturaj Gaikwad


दिल्ली कॅपिटल्स - ऋषभ पंत
Delhi Capitals: Rishabh Pant


गुजरात टायटन्स - शुभमन गिल
Gujarat Titans: Shubman Gill


कोलकाता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर
Kolkata Knight Riders: Shreyas Iyer


लखनौ सुपर जायंट्स - केएल राहुल
Lucknow Super Giants: KL Rahul


मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या
Mumbai Indians: Hardik Pandya


पंजाब किंग्स - शिखर धवन
Punjab Kings: Shikhar Dhawan


राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
Rajasthan Royals: Sanju Samson


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - फाफ डु प्लेसिस
Royal Challengers Bangalore: Faf du Plessis


सनरायजर्स हैदराबाद - पॅट कमिन्स
Sunrisers Hyderabad: Pat Cummins

CSK vs RCB Live Updates : चेन्नई सुपर किंग्ज संभाव्य प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड़ (कप्तान), रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, मोइन अली, डेरिल मिशेल, शिवम दुबे, रविंद्र जड़ेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महेश थीक्षाना।
चेन्नईतील खेळपट्टी कशी असेल?

चेन्नईत रंगतदार उद्घाटन सोहळा होणार

आयपीएल 2024च्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. यावेळी चेन्नईत रंगतदार उद्घाटन सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि एआर रहमान सारखे दिग्गज परफॉर्मन्स करणार आहेत. 

अंकशास्त्रानुसार जाणून घ्या, टीमच्या कर्णधारांचं आयपीएल किस्मत कनेक्शन

चेन्नई अन् आरसीबी कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार?

RCB Vs CSK संभाव्य Playing XI:


Royal Challengers Bengaluru : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरर, रीस टूली, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा


Chennai Super Kings: रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, एमएस धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान

आरसीबीपुढे मोठे आव्हान; केजीएफ सूत्रावर संघाची वाटचाल अवलंबून

'आरसीबी पुढे सर्वात मोठे आव्हान दडपण झुगारण्याचे असणार आहे. मजबूत फलंदाजी आणि दमदार अष्टपैलू खेळाडू असलेल्या 'आरसीबी'ची गोलंदाजी मात्र फारशी प्रभावी नाही. त्यामु‌ळे फलंदाजांच्या कामगिरीवरच या संघाचे यश अवलंबून आहे. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस या केजीएफ' सूत्रावर आरसीबी संघाची वाटचाल होईल. 





एका षटकांत दोन बाऊन्सर

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्यात एक गोलंदाज एका षटकांत फक्त एक बाउन्सर टाकू शकतो. आतापर्यंत आयपीएलमध्येही असे होत होते, परंतु 2024 च्या हंगामात हा नियम बदलण्यात आला आहे. आता गोलंदाज एका षटकात 2 बाऊन्सर चेंडू टाकू शकतील. यापूर्वी, हा नियम भारताच्या टी-20 देशांतर्गत स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला गेला आहे. याचा गोलंदाजांना फायदा होणार आहे.

'माही'साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खास पोस्ट

'माही'साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खास पोस्ट केली आहे. 





टेन्शन नॉट.... चेन्नईचं कर्णधारपद मिळताच ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया

चेन्नईचा कर्णधार झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड यानं मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ऋतुराज गायकवाड याचा याबाबतचा व्हिडीओ सीएसकेनं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ऋतुराज गायकवाड यानं कर्णधारपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. पण त्याशिवाय मोठी जबाबदारी असल्याचेही म्हटलं आहे. ऋतुराज गायकवाड म्हणाला की, कर्णधार झाल्यानंतर खूप भारी वाटतेय. पण ही एकप्रकारे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. पण संघात खूप अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधारपद देणं  हा माझा एकप्रकारे सन्मानाच आहे. माझ्यासोबत मार्गदर्शन करालायला माही भाई आहे. जड्डू भाई आहे, अज्जू भाई आहे. तोही एक महान कर्णधार आहे. त्यामुळे मला फार चिंता करण्याची गरज नाही, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला. 





सुरेश रैनाने घेतली एमएस धोनी अन् रवींद्र जडेजाची भेट

एमएस धोनीने काल अचानक कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश रैनाने एमएस धोनी आणि रवींद्र जडेजाची भेट घेतली. यावेळी धोनी आणि रैनामध्ये काही संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. 





पार्श्वभूमी

IPL 2024 Latest Marathi News: CSK vs RCB Score:  गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि आजपर्यंत कधीही जेतेपद पटकावता न आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील रोमांचक सामन्यापासून 'आयपीएल'च्या १७व्या सत्राला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा देशात लोकसभा निवडणूक रंगणार असून, त्या पार्श्वभूमीवर 'बीसीसीआय'ने केवळ पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे.






 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.